४ जुलै दिनविशेष | 4 July Dinvishesh | 4 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 3, 2024

४ जुलै दिनविशेष | 4 July Dinvishesh | 4 July day special in Marathi

४ जुलै दिनविशेष

4 July Dinvishesh

4 July day special in Marathi

४ जुलै दिनविशेष | 4 July Dinvishesh | 4 July day special in Marathi

            ४ जुलै दिनविशेष ( 4 July Dinvishesh | 4 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ४ जुलै दिनविशेष ( 4 July Dinvishesh | 4 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

४ जुलै दिनविशेष

4 July Dinvishesh

4 July day special in Marathi


@ युनायटेड स्टेट्सचा स्वातंत्र्य दिन [United States Independence Day]

[१०५४]=> वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

[१७२९]=> मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

[१७७६]=> अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

[१७९०]=> भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म.

[१८०७]=> इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी यांचा जन्म.

[१८२६]=> अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन.

[१८२६]=> अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

[१८३१]=> अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचे निधन.

[१८७२]=> अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज यांचा जन्म.

[१८८२]=> एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म.

[१८८६]=> फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.

[१८९७]=> भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म.

[१८९८]=> भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म.

[१९०२]=> भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन.


[१९०३]=> मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

[१९११]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

[१९१२]=> जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म.

[१९१४]=> जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म.

[१९२६]=> विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म.

[१९३४]=> नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन.

[१९३६]=> अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

[१९४६]=> फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१९४७]=> भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

[१९६३]=> भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन.

[१९७६]=> जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म.

[१९८०]=> रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन.

[१९८२]=> भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.

[१९८३]=> भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

[१९९५]=> टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.

[१९९७]=> नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

[१९९९]=> लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

[१९९९]=> विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन.


            तुम्हाला ४ जुलै दिनविशेष | 4 July Dinvishesh | 4 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad