६ जुलै दिनविशेष | 6 July Dinvishesh | 6 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 5, 2024

६ जुलै दिनविशेष | 6 July Dinvishesh | 6 July day special in Marathi

६ जुलै दिनविशेष

6 July Dinvishesh

6 July day special in Marathi

६ जुलै दिनविशेष | 6 July Dinvishesh | 6 July day special in Marathi

            ६ जुलै दिनविशेष ( 6 July Dinvishesh | 6 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ जुलै दिनविशेष ( 6 July Dinvishesh | 6 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ जुलै दिनविशेष

6 July Dinvishesh

6 July day special in Marathi


@ जागतिक प्राणी दिवस [World Zoonoses Day]

[१७३५]=> मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

[१७८१]=> सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचा जन्म.

[१७८५]=> डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.

[१८३७]=> प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म.

[१८५४]=> जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन.

[१८६२]=> मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म.

[१८८१]=> विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म.

[१८८५]=> लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.

[१८९०]=> भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म.

[१८९२]=> ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

[१९०१]=> केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म.

[१९०५]=> राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म.

[१९०८]=> रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

[१९१०]=> भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

[१९१४]=> डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म.

[१९२०]=> अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म.

[१९२७]=> लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म.

[१९३०]=> दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म.


[१९३५]=> चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.

[१९३९]=> जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.

[१९३९]=> भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.

[१९४६]=> अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.

[१९४६]=> अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा जन्म.

[१९४७]=> रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.

[१९५२]=> मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.

[१९६१]=> भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.

[१९७५]=> अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.

[१९८२]=> पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

[१९८६]=> तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.

[१९८६]=> स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन.

[१९९७]=> हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन.

[१९९९]=> कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.

[२००२]=> भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन.

[२००४]=> ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.

[२००६]=> चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

हे पण पहा :- बहुव्रीहि समास

            तुम्हाला ६ जुलै दिनविशेष | 6 July Dinvishesh | 6 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad