८ जुलै दिनविशेष | 8 July Dinvishesh | 8 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 7, 2024

८ जुलै दिनविशेष | 8 July Dinvishesh | 8 July day special in Marathi

८ जुलै दिनविशेष

8 July Dinvishesh

8 July day special in Marathi

८ जुलै दिनविशेष | 8 July Dinvishesh | 8 July day special in Marathi

            ८ जुलै दिनविशेष ( 8 July Dinvishesh | 8 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ जुलै दिनविशेष ( 8 July Dinvishesh | 8 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ जुलै दिनविशेष

8 July Dinvishesh

8 July day special in Marathi


@ भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म. [Birth of Indian cricket captain Sourav Ganguly]

[१४९७]=> वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.

[१६९५]=> डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन.

[१७८९]=> मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म.

[१८३१]=> कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म.

[१८३७]=> इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन.

[१८३९]=> रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म.

[१८५६]=> चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.

[१८८५]=> ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म.

[१८८९]=> द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

[१९१०]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

[१९१४]=> पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म.

[१९१६]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म.

[१९२२]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म.

[१९३०]=> किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

[१९४९]=> आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.

[१९५८]=> बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.


[१९६७]=> ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन.

[१९७२]=> भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

[१९८४]=> पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन.

[१९९४]=> उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन.

[१९९४]=> मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.

[१९९७]=> बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

[२००१]=> प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.

[२००३]=> संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.

[२००६]=> तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन.

[२००६]=> मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

[२००७]=> भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन.

[२००८]=> महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

[२०११]=> रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.

[२०१३]=> भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन.

हे पण पहा :- विशेषण

            तुम्हाला ८ जुलै दिनविशेष | 8 July Dinvishesh | 8 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad