९ जुलै दिनविशेष | 9 July Dinvishesh | 9 July day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 8, 2024

९ जुलै दिनविशेष | 9 July Dinvishesh | 9 July day special in Marathi

९ जुलै दिनविशेष

9 July Dinvishesh

9 July day special in Marathi

९ जुलै दिनविशेष | 9 July Dinvishesh | 9 July day special in Marathi

            ९ जुलै दिनविशेष ( 9 July Dinvishesh | 9 July day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ जुलै दिनविशेष ( 9 July Dinvishesh | 9 July day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ जुलै दिनविशेष

9 July Dinvishesh

9 July day special in Marathi


वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले. [The tiger was declared the national animal of India.]

[१६८९]=> फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.

[१७२१]=> जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.

[१८१९]=> शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म.

[१८५६]=> इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन.

[१८७३]=> मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

[१८७४]=> इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

[१८७७]=> विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.

[१८९३]=> डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.

[१९२१]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म.

[१९२५]=> प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा 
जन्म.


[१९२६]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.

[१९३०]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म.

[१९३२]=> अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन.

[१९३८]=> चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म.

[१९४४]=> भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.

[१९५०]=> युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.

[१९५१]=> भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

[१९६८]=> सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन.

[१९६९]=> वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

[१९७१]=> नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.

[१९९३]=> संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

[२०००]=> अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.

[२००५]=> महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन.

[२०११]=> सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

हे पण पहा :- तद्भव शब्द

            तुम्हाला ९ जुलै दिनविशेष | 9 July Dinvishesh | 9 July day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad