१ सप्टेंबर दिनविशेष
1 September Dinvishesh
1 September day special in Marathi
१ सप्टेंबर दिनविशेष ( 1 September Dinvishesh | 1 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १ सप्टेंबर दिनविशेष ( 1 September Dinvishesh | 1 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१ सप्टेंबर दिनविशेष
1 September Dinvishesh
1 September day special in Marathi
@ राष्ट्रीय पोषण दिन [National Nutrition Day]
[१५८१]=> शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन.
[१७१५]=> फ्रान्सचा राजा लुई (१४वा) यांचे निधन.
[१७९५]=> न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म.
[१८१८]=> कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म.
[१८९३]=> प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन.
[१८९५]=> मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म.
[१८९६]=> हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म.
[१९०६]=> इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
[१९०८]=> हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म.
[१९११]=> पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
[१९१४]=> रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.
[१९१५]=> ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.
[१९२१]=> यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.
[१९२३]=> टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
[१९३०]=> भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म.
[१९३१]=> भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म.
[१९३९]=> जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्या महायुद्धाची सुरुवात झाली.
[१९४६]=> दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.
[१९४९]=> लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.
[१९५१]=> अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
[१९५६]=> भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.
[१९६१]=> NCERT ची स्थापना
[१९६९]=> लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.
[१९७०]=> भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.
[१९७२]=> अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.
[१९७९]=> पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
[१९८५]=> संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.
[१९९१]=> उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
[२००८]=> बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन.
[२०१४]=> स्पॅनडेक्स चे निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन.
Read Also :- Cardinal Numbers
तुम्हाला १ सप्टेंबर दिनविशेष | 1 September Dinvishesh | 1 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
Read Also :- Cardinal Numbers
तुम्हाला १ सप्टेंबर दिनविशेष | 1 September Dinvishesh | 1 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box