१० ऑगस्ट दिनविशेष | 10 August Dinvishesh | 10 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 9, 2024

१० ऑगस्ट दिनविशेष | 10 August Dinvishesh | 10 August day special in Marathi

१० ऑगस्ट दिनविशेष

10 August Dinvishesh

10 August day special in Marathi

१० ऑगस्ट दिनविशेष | 10 August Dinvishesh | 10 August day special in Marathi

            १० ऑगस्ट दिनविशेष ( 10 August Dinvishesh | 10 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० ऑगस्ट दिनविशेष ( 10 August Dinvishesh | 10 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० ऑगस्ट दिनविशेष

10 August Dinvishesh

10 August day special in Marathi


जागतिक सिंह दिन [World Lion Day]

जागतिक जैवइंधन दिन [World Biofuel Day]

[१६७५]=> चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.

[१७५५]=> ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म.

[१८१०]=> इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म.

[१८१०]=> स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.

[१८१४]=> नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म.

[१८२१]=>
 मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.

[१८५५]=> जयपूर – अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म.

[१८६०]=> संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म.

[१८७४]=> अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचा जन्म.

[१८८९]=> मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्म.

[१८९४]=> भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म.

[१९०२]=> कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा जन्म.

[१९१३]=> संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म.

[१९३३]=> कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्म.

[१९४३]=> भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा जन्म.

[१९५०]=> संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन.


[१९५६]=> भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म.

[१९६०]=> भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म.

[१९६३]=> भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म.

[१९८०]=> पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन.

[१९८२]=> भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन.

[१९८६]=> महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली.

[१९८८]=> दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.

[१९९०]=> मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

[१९९२]=> कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते.

[१९९७]=> कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.

[१९९९]=> इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.

[१९९९]=> औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.

[१९९९]=> भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन.

[२०१२]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन.


            तुम्हाला १० ऑगस्ट दिनविशेष | 10 August Dinvishesh | 10 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad