११ ऑगस्ट दिनविशेष | 11 August Dinvishesh | 11 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 10, 2024

११ ऑगस्ट दिनविशेष | 11 August Dinvishesh | 11 August day special in Marathi

११ ऑगस्ट दिनविशेष

11 August Dinvishesh

11 August day special in Marathi

११ ऑगस्ट दिनविशेष | 11 August Dinvishesh | 11 August day special in Marathi

            ११ ऑगस्ट दिनविशेष ( 11 August Dinvishesh | 11 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ११ ऑगस्ट दिनविशेष ( 11 August Dinvishesh | 11 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

११ ऑगस्ट दिनविशेष

11 August Dinvishesh

11 August day special in Marathi


जागतिक स्टीलपान दिन [World Steelpan Day]

[ई.पु. ३११४]=> मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर सुरु झाले.

[१८७७]=> अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.

[१८९७]=> बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचा जन्म.

[१९०८]=> क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन.

[१९११]=> पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म.

[१९२८]=> लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म.

[१९२८]=> संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचा जन्म.

[१९४३]=> पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जन्म.

[१९४३]=> सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

[१९४४]=> फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म.

[१९५०]=> ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म.

[१९५२]=> हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.

[१९५४]=> क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.

[१९६०]=> चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.


[१९६१]=> दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

[१९७०]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन.

[१९७९]=> गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

[१९८७]=> युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.

[१९९४]=> अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.

[१९९९]=> क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन.

[१९९९]=> बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.

[१९९९]=> शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

[२०००]=> दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन.

[२००३]=> स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन.

[२०१३]=> डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

[२०१३]=> भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन.


            तुम्हाला ११ ऑगस्ट दिनविशेष | 11 August Dinvishesh | 11 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad