१५ ऑगस्ट दिनविशेष | 15 August Dinvishesh | 15 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 14, 2024

१५ ऑगस्ट दिनविशेष | 15 August Dinvishesh | 15 August day special in Marathi

१५ ऑगस्ट दिनविशेष

15 August Dinvishesh

15 August day special in Marathi

१५ ऑगस्ट दिनविशेष | 15 August Dinvishesh | 15 August day special in Marathi

            १५ ऑगस्ट दिनविशेष ( 15 August Dinvishesh | 15 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १५ ऑगस्ट दिनविशेष ( 15 August Dinvishesh | 15 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१५ ऑगस्ट दिनविशेष

15 August Dinvishesh

15 August day special in Marathi


भारताचा स्वातंत्र्य दिन [Independence Day of India]

[१०५७]=> स्कॉटलंडचा राजा मॅक बेथ यांचे निधन.

[१११८]=> कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट ऍलेक्सियस (पहिला) यांचे निधन.

[१५१९]=> पनामा सिटी शहराची स्थापना झाली.

[१६६४]=> कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.

[१७६९]=> फ्रान्सचा सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांचा जन्म.

[१७९८]=> भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म.

[१८२४]=> अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.

[१८६२]=> मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

[१८६५]=> रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म.

[१८६७]=> रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म.

[१८७२]=> क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.

[१८७२]=> भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म.

[१८७३]=> भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म.

[१९०४]=> मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म.

[१९१२]=> इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म.


[१९१३]=> लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म.

[१९१४]=> पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.

[१९१५]=> ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म.

[१९१७]=> लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म.

[१९२२]=> लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.

[१९२९]=> ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.

[१९२९]=> साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म.

[१९३५]=> अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन.

[१९४२]=> स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.

[१९४५]=> बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.

[१९४७]=> चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.

[१९४७]=> पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

[१९४७]=> भारत देश स्वतंत्र झाला.

[१९४७]=> मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.

[१९४८]=> दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.

[१९५८]=> अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म.

[१९६०]=> कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.

[१९६१]=> भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.

[१९६४]=> बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.


[१९६९]=> ISRO ची स्थापना

[१९७१]=> अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.

[१९७१]=> बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१९७१]=> भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.

[१९७४]=> स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली.

[१९७५]=> बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन.

[१९७५]=> बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.

[१९७५]=> भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.

[१९८२]=> भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.

[१९८८]=> मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

[१९९२]=> भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.

[२००४]=> गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन.

[२००५]=> भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन.


            तुम्हाला १५ ऑगस्ट दिनविशेष | 15 August Dinvishesh | 15 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad