१६ ऑगस्ट दिनविशेष | 16 August Dinvishesh | 16 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 15, 2024

१६ ऑगस्ट दिनविशेष | 16 August Dinvishesh | 16 August day special in Marathi

१६ ऑगस्ट दिनविशेष

16 August Dinvishesh

16 August day special in Marathi

१६ ऑगस्ट दिनविशेष | 16 August Dinvishesh | 16 August day special in Marathi

            १६ ऑगस्ट दिनविशेष ( 16 August Dinvishesh | 16 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ ऑगस्ट दिनविशेष ( 16 August Dinvishesh | 16 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ ऑगस्ट दिनविशेष

16 August Dinvishesh

16 August day special in Marathi


[१७०५]=> स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन.

[१८७९]=> संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म.

[१८८६]=> स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली.

[१८८८]=> कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचे निधन.

[१९०४]=> हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म.

[१९१३]=> इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचा जन्म.

[१९१३]=> स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

[१९३२]=> रॅमसे मॅक्डोनाल्ड चा जातीय निवाडा.

[१९४६]=> कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.

[१९४६]=> सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.

[१९४८]=> भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.

[१९५०]=> ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.

[१९५२]=> गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.

[१९५४]=> पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.

[१९५४]=> स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

[१९५७]=> भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म.

[१९५८]=> अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.


[१९६०]=> सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९६१]=> भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन.

[१९६२]=> आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.

[१९६८]=> भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

[१९७०]=> अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.

[१९७०]=> नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.

[१९७७]=> अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचे निधन.

[१९९४]=> बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.

[१९९७]=> अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.

[१९९७]=> कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन.

[२०००]=> राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन.

[२००३]=> युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.

[२०१०]=> कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन.

[२०१०]=> जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

[२०१८]=> भारताचे १० वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन.


            तुम्हाला १६ ऑगस्ट दिनविशेष | 16 August Dinvishesh | 16 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad