२ ऑगस्ट दिनविशेष | 2 August Dinvishesh | 2 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 1, 2024

२ ऑगस्ट दिनविशेष | 2 August Dinvishesh | 2 August day special in Marathi

२ ऑगस्ट दिनविशेष

2 August Dinvishesh

2 August day special in Marathi

२ ऑगस्ट दिनविशेष | 2 August Dinvishesh | 2 August day special in Marathi

            २ ऑगस्ट दिनविशेष ( 2 August Dinvishesh | 2 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ ऑगस्ट दिनविशेष ( 2 August Dinvishesh | 2 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ ऑगस्ट दिनविशेष

2 August Dinvishesh

2 August day special in Marathi


[१५८९]=> फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचे निधन.

[१६७७]=> शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.

[१७८१]=> पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन.

[१७९०]=> अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.

[१८२०]=> ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म.

[१८३४]=> स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म.

[१८३५]=> वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचा जन्म.

[१८६१]=> भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म.

[१८७०]=> जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.

[१८७६]=> भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म.

[१८७७]=> भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म.

[१८९२]=> वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म.

[१९१०]=> कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म.

[१९१८]=> आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.


[१९२२]=> टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन.

[१९२३]=> काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.

[१९२९]=> भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म.

[१९३२]=> अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म.

[१९३४]=> जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन.

[१९४१]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म.

[१९४५]=> भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.

[१९५४]=> दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.

[१९५८]=> भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म.

[१९७८]=> मोनॅको ग्रांप्री चे स्थापक अॅन्टोनी नोगेस यांचे निधन.

[१९७९]=> नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.

[१९९०]=> इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे गुल्फ युद्ध सुरु झाले.

[१९९६]=> अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.

[२००१]=> ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.


            तुम्हाला २ ऑगस्ट दिनविशेष | 2 August Dinvishesh | 2 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad