२ सप्टेंबर दिनविशेष | 2 September Dinvishesh | 2 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 1, 2024

२ सप्टेंबर दिनविशेष | 2 September Dinvishesh | 2 September day special in Marathi

२ सप्टेंबर दिनविशेष

2 September Dinvishesh

2 September day special in Marathi

२ सप्टेंबर दिनविशेष | 2 September Dinvishesh | 2 September day special in Marathi

            २ सप्टेंबर दिनविशेष ( 2 September Dinvishesh | 2 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ सप्टेंबर दिनविशेष ( 2 September Dinvishesh | 2 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ सप्टेंबर दिनविशेष

2 September Dinvishesh

2 September day special in Marathi


@ जागतिक नारळ दिन [World Coconut Day]

@ वि.स. खांडेकर यांची जयंती [V.S. Khandekar birth anniversary]


[१५४०]=> इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) यांचे निधन.

[१८३८]=> भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म.

[१८५३]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म.

[१८६५]=> आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन यांचे निधन.

[१८७७]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.

[१८८६]=> साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म.

[१९१६]=> पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

[१९२०]=> म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.

[१९२४]=> केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.

[१९३२]=> स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म.

[१९३७]=> आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन यांचे निधन.

[१९३९]=> दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.

[१९४१]=> चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.

[१९४५]=> व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.


[१९४६]=> भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

[१९५२]=> अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांचा जन्म.

[१९५३]=> अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म.

[१९६०]=> केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

[१९६०]=> वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.

[१९६५]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.

[१९६९]=> व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचे निधन.

[१९७१]=> भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.

[१९७६]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन.

[१९८८]=> भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.

[१९८८]=> भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म.

[१९९०]=> मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन.

[१९९९]=> चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन.

[१९९९]=> भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

[२००९]=> आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन.

[२०११]=> संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन.

Read Also :-  Action Verbs

            तुम्हाला २ सप्टेंबर दिनविशेष | 2 September Dinvishesh | 2 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad