२२ ऑगस्ट दिनविशेष | 22 August Dinvishesh | 22 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 21, 2024

२२ ऑगस्ट दिनविशेष | 22 August Dinvishesh | 22 August day special in Marathi

२२ ऑगस्ट दिनविशेष

22 August Dinvishesh

22 August day special in Marathi

२२ ऑगस्ट दिनविशेष | 22 August Dinvishesh | 22 August day special in Marathi

            २२ ऑगस्ट दिनविशेष ( 22 August Dinvishesh | 22 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ ऑगस्ट दिनविशेष ( 22 August Dinvishesh | 22 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ ऑगस्ट दिनविशेष

22 August Dinvishesh

22 August day special in Marathi


जागतिक वनस्पती दूध दिवस [World Plant Milk Day]

[१३५०]=> फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.

[१६०७]=> लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.

[१६३९]=> ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

[१६४७]=> प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म.

[१८१८]=> भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन.

[१८४८]=> अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

[१८४८]=> शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म.

[१८९३]=> अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.

[१९०२]=> कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

[१९०२]=> मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

[१९०४]=> सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म.

[१९१५]=> इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म.

[१९१५]=> बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म.

[१९१८]=> सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म.

[१९१९]=> हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म.

[१९२०]=> हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.


[१९३५]=> कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

[१९५५]=> अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.

[१९६२]=> फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

[१९६४]=> स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.

[१९६७]=> जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन.

[१९७२]=> वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

[१९७८]=> केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन.

[१९८०]=> चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन.

[१९८०]=> मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन.

[१९८२]=> क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन.

[१९८९]=> ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन.

[१९९५]=> संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.

[१९९९]=> मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन.


            तुम्हाला २२ ऑगस्ट दिनविशेष | 22 August Dinvishesh | 22 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad