२३ ऑगस्ट दिनविशेष | 23 August Dinvishesh | 23 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 22, 2024

२३ ऑगस्ट दिनविशेष | 23 August Dinvishesh | 23 August day special in Marathi

२३ ऑगस्ट दिनविशेष

23 August Dinvishesh

23 August day special in Marathi

२३ ऑगस्ट दिनविशेष | 23 August Dinvishesh | 23 August day special in Marathi

            २३ ऑगस्ट दिनविशेष ( 23 August Dinvishesh | 23 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ ऑगस्ट दिनविशेष ( 23 August Dinvishesh | 23 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ ऑगस्ट दिनविशेष

23 August Dinvishesh

23 August day special in Marathi


राष्ट्रीय अंतराळ दिवस [National Space Day]

[ई.पु.६३४]=> अबू बकर अरब खलिफा यांचे निधन.

[१३६३]=> डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन.

[१७५४]=> फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचा जन्म.

[१८०६]=> फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन.

[१८३९]=> युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

[१८५२]=> भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म.

[१८७२]=> भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म.

[१८९०]=> न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म.

[१८९२]=> ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन.

[१९१४]=> पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९१८]=> श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.

[१९४२]=> मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.

[१९४४]=> चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म.

[१९५१]=> जॉर्डनची राणी नूर यांचा जन्म.

[१९६६]=> लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.


[१९७१]=> मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन.

[१९७३]=> मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांचा जन्म.

[१९७४]=> मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन.

[१९७५]=> नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते पं. विनायकराव पटवर्धन यांचे निधन.

[१९९०]=> आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

[१९९१]=> वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

[१९९४]=> इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचे निधन.

[१९९७]=> ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन.

[१९९७]=> हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

[२००५]=> कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

[२०११]=> लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.

[२०१२]=> राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.

[२०१३]=> आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन.


            तुम्हाला २३ ऑगस्ट दिनविशेष | 23 August Dinvishesh | 23 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad