२८ ऑगस्ट दिनविशेष | 28 August Dinvishesh | 28 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 27, 2024

२८ ऑगस्ट दिनविशेष | 28 August Dinvishesh | 28 August day special in Marathi

२८ ऑगस्ट दिनविशेष

28 August Dinvishesh

28 August day special in Marathi

२८ ऑगस्ट दिनविशेष | 28 August Dinvishesh | 28 August day special in Marathi

            २८ ऑगस्ट दिनविशेष ( 28 August Dinvishesh | 28 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ ऑगस्ट दिनविशेष ( 28 August Dinvishesh | 28 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ ऑगस्ट दिनविशेष

28 August Dinvishesh

28 August day special in Marathi


[१६६७]=> जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन.

[१७४९]=> जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म.

[१८४५]=> सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

[१८९६]=> उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म.

[१९०६]=> रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.

[१९१६]=> पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

[१९१६]=> पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.

[१९१८]=> मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म.

[१९२८]=> भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.

[१९२८]=> सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म.

[१९३१]=> फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.


[१९३४]=> सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म.

[१९३७]=> टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.

[१९३८]=> कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म.

[१९५४]=> भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.

[१९६५]=> पोकेमोन चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म.

[१९६६]=> माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.

[१९६९]=> भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.

[१९८४]=> इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन.

[१९९०]=> इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

[२००१]=> लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २८ ऑगस्ट दिनविशेष | 28 August Dinvishesh | 28 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad