४ ऑगस्ट दिनविशेष | 4 August Dinvishesh | 4 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 3, 2024

४ ऑगस्ट दिनविशेष | 4 August Dinvishesh | 4 August day special in Marathi

४ ऑगस्ट दिनविशेष

4 August Dinvishesh

4 August day special in Marathi

४ ऑगस्ट दिनविशेष | 4 August Dinvishesh | 4 August day special in Marathi

            ४ ऑगस्ट दिनविशेष ( 4 August Dinvishesh | 4 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ४ ऑगस्ट दिनविशेष ( 4 August Dinvishesh | 4 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

४ ऑगस्ट दिनविशेष

4 August Dinvishesh

4 August day special in Marathi


[२२१]=> चीनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन.

[१०६०]=> फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचे निधन.

[१७३०]=> पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म.

[१८२१]=> लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म.

[१८३४]=> ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म.

[१८४५]=> कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म.

[१८५४]=> जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.

[१८६३]=> पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.

[१८७५]=> डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन.

[१८८८]=> भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म.

[१८९४]=> साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म.

[१९१४]=> पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.

[१९२४]=> सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

[१९२९]=> पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म.


[१९३१]=> यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म.

[१९३७]=> प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन.

[१९४७]=> जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

[१९५०]=> भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म.

[१९५६]=> भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

[१९६१]=> अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म.

[१९७७]=> नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन.

[१९७८]=> भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.

[१९८४]=> अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.

[१९९३]=> राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या चार सहकार्‍यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.

[१९९७]=> १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचे निधन.

[१९९८]=> फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

[२००१]=> मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

[२००३]=> नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन.

[२००७]=> नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.


            तुम्हाला ४ ऑगस्ट दिनविशेष | 4 August Dinvishesh | 4 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad