७ ऑगस्ट दिनविशेष
7 August Dinvishesh
7 August day special in Marathi
७ ऑगस्ट दिनविशेष ( 7 August Dinvishesh | 7 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ७ ऑगस्ट दिनविशेष ( 7 August Dinvishesh | 7 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
७ ऑगस्ट दिनविशेष
7 August Dinvishesh
7 August day special in Marathi
[१७८९]=> अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
[१८४८]=> स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन.
[१८७१]=> जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म.
[१८७६]=> पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्म.
[१९१२]=> हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म.
[१९२५]=> पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म.
[१९३४]=> जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन.
[१९३६]=> दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.
[१९४१]=> रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
[१९४७]=> थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
[१९४७]=> मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
[१९४८]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म.
[१९६६]=> विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म.
[१९७४]=> भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन.
[१९८१]=> सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
[१९८५]=> जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
[१९८७]=> अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
[१९९०]=> गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
[१९९१]=> जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
[१९९७]=> चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
[१९९८]=> अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
[२०००]=> ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
तुम्हाला ७ ऑगस्ट दिनविशेष | 7 August Dinvishesh | 7 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
तुम्हाला ७ ऑगस्ट दिनविशेष | 7 August Dinvishesh | 7 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box