८ ऑगस्ट दिनविशेष | 8 August Dinvishesh | 8 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 7, 2024

८ ऑगस्ट दिनविशेष | 8 August Dinvishesh | 8 August day special in Marathi

८ ऑगस्ट दिनविशेष

8 August Dinvishesh

8 August day special in Marathi

८ ऑगस्ट दिनविशेष | 8 August Dinvishesh | 8 August day special in Marathi

            ८ ऑगस्ट दिनविशेष ( 8 August Dinvishesh | 8 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ ऑगस्ट दिनविशेष ( 8 August Dinvishesh | 8 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ ऑगस्ट दिनविशेष

8 August Dinvishesh

8 August day special in Marathi


आंतरराष्ट्रीय मांजर दिवस [International Cat Day]

[१०७८]=> जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्म.

[१५०९]=> कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले.

[१६४८]=> स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

[१८२७]=> ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन.

[१८७९]=> अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्म.

[१८९७]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन.

[१९०२]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म.

[१९०८]=> विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.

[१९१२]=> कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचा जन्म.

[१९१२]=> जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्म.

[१९२५]=> शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म.

[१९२६]=> साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म.

[१९३२]=> अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके यांचा जन्म.

[१९३४]=> भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म.

[१९४०]=> क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म.

[१९४२]=> क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.

[१९४२]=> चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

[१९४२]=> भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.


[१९५०]=> प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म.

[१९५२]=> भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म.

[१९६३]=> इंग्लंडमधे १५ जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.

[१९६७]=> इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.

[१९६८]=> भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्म.

[१९८१]=> स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्म.

[१९८५]=> भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

[१९९४]=> पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.

[१९९८]=> लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.

[१९९८]=> संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

[१९९९]=> चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.

[२०००]=> महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.

[२००८]=> चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.


            तुम्हाला ८ ऑगस्ट दिनविशेष | 8 August Dinvishesh | 8 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad