९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August Dinvishesh | 9 August day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 8, 2024

९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August Dinvishesh | 9 August day special in Marathi

९ ऑगस्ट दिनविशेष

9 August Dinvishesh

9 August day special in Marathi

९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August Dinvishesh | 9 August day special in Marathi

            ९ ऑगस्ट दिनविशेष ( 9 August Dinvishesh | 9 August day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ ऑगस्ट दिनविशेष ( 9 August Dinvishesh | 9 August day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ ऑगस्ट दिनविशेष

9 August Dinvishesh

9 August day special in Marathi


राष्ट्रीय क्रांती दिन [National Revolution Day]

जागतिक मूलनिवासी (आदिवासी) दिन [World Indigenous Day

[ई.पु.११७]=> रोमन सम्राट ट्राजान यांचे निधन.

[११०७]=> जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन.

[११७३]=> पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.

[१७५४]=> वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म.

[१७७६]=> इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचा जन्म.

[१८९०]=> संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म.

[१८९२]=> थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.

[१९०१]=> मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन.

[१९०९]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म.

[१९२०]=> घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म.

[१९२५]=> चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.


[१९४२]=> भारत छोडो दिन

[१९४५]=> अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.

[१९४८]=> हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन.

[१९६५]=> मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.

[१९७४]=> वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.

[१९७५]=> पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.

[१९७५]=> भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.

[१९७६]=> ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन.

[१९९१]=> अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी यांचा जन्म.

[१९९३]=> छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.

[१९९६]=> जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन.

[२०००]=> भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

[२००२]=> ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन.


            तुम्हाला ९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August Dinvishesh | 9 August day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad