१ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी | Akarik mulyamapan nondi 1 to 8 pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 21, 2024

१ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी | Akarik mulyamapan nondi 1 to 8 pdf

१ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी

आकारिक मूल्यमापन नोंदी

Akarik mulyamapan nondi 1 to 8 pdf

१ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी | Akarik mulyamapan nondi 1 to 8 pdf

            आकारिक मूल्यमापन नोंदी १ ते ८ किवा १ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कोणत्या आहेत हे पाहण्या अगोदर आपल्याला त्यांची गरज व उपयुक्तता कोठे आहे हे पहाणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला नवीन मूल्यमापन पद्धत म्हणजेच सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (सीसीई) [ Continuous and Comprehensive Evaluation (CCE) समजणे गरजेचे आहे त्यामध्ये आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन काय आहे हे समजणे गरजेचे आहे.
            सन २०१०-११ या वर्षापासून महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मुल्यांकन पद्धतीमध्ये बदल केलेला आहे त्यानुसार आता विद्यार्थ्यांचे मुल्यांकन पारंपारिक पद्धतीने नकरता त्यात विशेष बदल केलेला पाहायला मिळतो. पूर्वी फक्त लेखी व तोंडी परीक्षे मार्फत मूल्यमापन केले जायचे परंतु आता लेखी, तोंडी, उपक्रम, कृती, प्रकल्प, वर्गातील कार्य, गृहकार्य अशा अनेक प्रकारे त्यांचे मुल्यांकन केले जाते. आताचे मूल्यमापन हे सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (सीसीई) [ Continuous and Comprehensive Evaluation (CCE) ] प्रकारचे आहे. हे वर्षभर सतत चालते.


सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (सीसीई) चे दोन भागात आहेत.

१] आकारिक मूल्यमापन
२] संकलित मूल्यमापन

१] आकारिक मूल्यमापन म्हणजे काय?

            विद्यार्थी शाळेत शिकत असताना जसे जसे त्याचे वय वाढते तस तसे त्याच्या शरीराचा व मनाचा देखील विकास होत असतो. या विकासाला योग्य वळण देण्यासाठी सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (सीसीई) अशा नवीन पद्धतीचा शासनाने शिक्षणात स्विकार केला आहे. ही पद्धती प्रभावी वाटल्यामुळे अद्याप त्याच पद्धतीने मुलांचे मूल्यमापन केले जाते. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू असताना त्याचे मूल्यमापन केले जाते. त्याच्या व्यक्तीमत्वात शिक्षण घेत असताना बदल होत असतो हा बदल त्याच्यात कशा व किती प्रकारे झाला हे आकारिक मूल्यमापना द्वारे तपासले जाते. 
            आकारिक मूल्यमापन तपासण्यासाठी एकूण आठ साधनांचा उपयोग केला जातो ती पुढील प्रमाणे आहेत.

आकारिक मूल्यमापनाची साधने कोणती?

१]दैनिक निरीक्षण
२]तोंडी काम [ प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भांषण-संभाषण, भूमिकाभिनय, भूमिका निभावणे, मुलाखत, गटचर्चा, कथन कौशल्य, कविता वाचन इ.]
३]प्रयोग / प्रात्यक्षिके
४]प्रकल्प
५]उपक्रम / कृती [ वैयक्तिक, सामुहिक, स्व-अध्ययन ]
६]लेखी / चाचणी [ पाठ्यपुस्तकावर किवा त्याच्या व्यतिरिक्त]
७]वर्गकार्य / गृहकार्य / स्वाध्याय
८]इतर [प्रश्नावली, गट वाचन मूल्यांकन, स्व-मूल्यांकन, गट कार्य]

            सामान्यतः कला व संगीत, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी तीन साधनतंत्राचा वापर केला जातो. व इतर विषयांसाठी आठ पैकी कोणतेही साधन वापरले जातात.
१] दैनंदिन निरीक्षण
२] प्रात्यक्षिक
३] उपक्रम/कृती



२] संकलित मूल्यमापन म्हणजे काय?

            संकलित मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांनी आकारिक मूल्यमापनाद्वारे जे ज्ञान प्राप्त केले आहे हे त्याचा ते आपल्या वैयक्तिक जीवनात किती उत्तम प्रकारे उपयोग करू शकतात याची माहिती करून घेणे तसेच ती दृढ करणे यासाठी संकलित मूल्यमापन केले जाते. संकलित मूल्यमापन हे प्रत्येक सत्राच्या शेवटी घेतले जाते.

संकलितची मूल्यमापनाची साधने कोणती?

1] तोंडी
2] प्रात्यक्षिक
3] लेखी

आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन यांचे गुणदान वाटप कसे केले जाते?

आकारिक व संकलित गुणदान

क्रइयत्ताआ.
गुण
सं.
गुण
एकूण

पहिली ते दुसरी

७०

३०

१००

तिसरी ते चौथी६०४०१००

3

पाचवी ते सहावी

५०

५०

१००

सातवी ते आठवी४०६०१००

आ.आकारिक मूल्यमापन
सं . = संकलित मूल्यमापन


१ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी PDF

१ ते ८ आकारिक मूल्यमापन नोंदी PDF

क्रविषयपहा
मराठीनोंदी
हिंदीनोंदी
इंगजीनोंदी
गणितनोंदी
गणित ( सेमी )नोंदी
सामान्य विज्ञाननोंदी
सामान्य विज्ञान ( सेमी )नोंदी
समाजशास्रनोंदी 
कलानोंदी
१०कार्यानुभवनोंदी
११शारीरिक शिक्षणनोंदी
१२आवड / छंदनोंदी
१३विशेष प्रगती नोंदीनोंदी
१४व्यक्तिमत्व गुणविशेषनोंदी
१५परिसर अभ्यासनोंदी



          तुम्हाला १ ते ८ वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी | Akarik mulyamapan nondi 1 to 8 pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad