आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ६ ते ८ | Akarik mulyamapan nondi Samajshastra 6 to 8 pdf | Varnanatmak nondi pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 19, 2024

आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ६ ते ८ | Akarik mulyamapan nondi Samajshastra 6 to 8 pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ६ ते ८

Akarik mulyamapan nondi Samajshastra 6 to 8 ( Social Studies) pdf

वर्णनात्मक नोंदी PDF समाजशास्र

आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ६ ते ८ | Akarik mulyamapan nondi Samajshastra 6 to 8 pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र ६ ते ८ | Akarik mulyamapan nondi Samajshastra 6 to 8 pdf | Varnanatmak nondi pdf ) :- येथे तुम्हाला इयत्ता ६ वी ते ८ वी च्या समाजशास्र विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी इयत्ता प्रमाणे दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.


इयत्ता :- ६ वी [ समाजशास्र ]

आकारिक नोंदी समाजशास्र विषय

अ क्रआकारिक नोंदी
०१भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम लोकजीवनावर होतो हे समजून घेतो.
०२इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध असतो हे जाणतो.
०३ऐतिहासिक साधनांचे निरीक्षण करून ओळखतो.
०४ऐतिहासिक साधनांचे संकलन करतो.
०५ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो.
०६ऐतिहासिक वस्तू व वास्तूंच्या जतनाचे स्वतः प्रयत्न करतो व इतरांना प्रेरणा देतो.
०७तत्कालीन व सध्याची नगररचना यांची तुलना करतो.
०८
हडप्पाकालीन सांडपाण्याची व्यवस्था परिपूर्ण होती हे जाणून घेतो.
०९हडप्पाकालीन लोकजीवन व व्यापार यांची माहिती करून घेतो.
१०वैदिक काळातील वाङ्मयाविषयी माहिती करून घेतो.
११वैदिक काळातील लोकजीवनाविषयी माहिती मिळवतो.
१२आश्रमव्यवस्था समजून घेतो.
१३प्राचीन भारतीय स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयी चर्चा करतो.
१४सर्व धर्मांविषयी आदर बाळगतो.
१५सर्व धर्मांच्या शिकवणुकीतील साम्यस्थळे शोधतो.
१६वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीचे महत्त्व जाणून घेतो.
१७मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे समजतो.
१८नकाशात जनपदे व महाजनपदे यांची स्थाने दर्शवतो.
१९प्राचीन भारतातील जनपदे आणि महाजनपदे यांच्या गणराज्यव्यवस्थेचे स्वरूप समजून घेतो.
२०शासनव्यवस्थेचे बदलते स्वरूप समजून घेतो.

आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र

अ क्रआकारिक नोंदी
२१भारताचे ग्रीक व इराणशी संबंध आल्यामुळे त्यांच्यात परस्पर देवाणघेवाण सुरू झाली हे जाणून घेतो.
२२मौर्यकालीन सुव्यवस्थित प्रशासन समजून घेतो.
२३सम्राट अशोकाने प्रजेच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती मिळवतो.
२४प्राचीन भारतीय कला व साहित्य यांची माहिती मिळवतो.
२५या काळातील राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन समजून घेतो.
२६प्राचीन भारतातील ईशान्येकडील राजसत्तांविषयी माहिती घेतो.
२७या काळातील राजघराण्यांविषयी माहिती मिळवतो.
२८
या काळातील सांस्कृतिक प्रगती समजून घेतो.
२९पल्लवांच्या काळात भारताचे आग्नेय आशियाशी सांस्कृतिक संबंध होते हे जाणून घेतो.
३०प्राचीन भारतीय कला व साहित्य यांच्या प्रगतीविषयी माहिती मिळवतो.
३१
गणित व विज्ञान या क्षेत्रांत भारतीयांनी केलेली प्रगती जाणून घेतो.
३२या काळातील लोकजीवनाविषयी माहिती मिळवतो.
३३या काळात विदयेच्या क्षेत्रात झालेली प्रगती विशद करतो.
३४भारतीय संस्कृती आणि इतर संस्कृती यांच्यातील आदानप्रदान समजून घेतो. 
३५समाजातील विविध घटकांच्या परस्पर सहकार्यातून शिस्त व नियमांचा आदर करतो.
३६व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेतो.
३७भारतात विविध भाषा बोलणारे, विविध धर्मांचे लोक असूनही त्यांच्यात एकता आहे हे ओळखतो.
३८राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वधर्मसमभावाची आवश्यकता जाणतो.
३९सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे हे जाणून घेतो.
४०ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेतो.



वर्णनात्मक नोंदी समाजशास्र विषय

अ क्रआकारिक नोंदी
४१
पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवतो.
४२जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवतो.
४३स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेतो.
४४शहरी स्थानिक शासन संस्थांची रचना व कार्य समजून घेतो.
४५शहरी स्थानिक शासन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविषयी व प्रशासनाविषयी माहिती घेतो.
४६
ग्रामीण आणि शहरी भागांतील समस्या भिन्न असतात हे समजून घेतो.
४७जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकाऱ्याची भूमिका समजावून घेतो.
४८
जिल्हा पोलीस प्रशासनाची माहिती मिळवतो.
४९न्यायालयाचे महत्त्व समजून घेतो.
५०स्थानिक प्रशासन हे लोककल्याणासाठीच असते हे समजून घेतो.
५१
आपत्ती निवारणाच्या कामात प्रशासनाबरोबरच लोकसहभाग आवश्यक असतो हे समजून घेतो.
५२वैचारिक व सांस्कृतिक आदानप्रदानाने मानवाचे ज्ञान अधिक समृद्ध होते हे समजून घेतो.
५३प्राचीन भारतात आलेल्या परकीय प्रवाशांविषयी माहिती मिळवतो.


हे पण पहा :- मराठी बोधकथा

इयत्ता :- ७ वी [ समाजशास्र ]

आकारिक नोंदी समाजशास्र विषय

अ क्रआकारिक नोंदी
०१ मध्ययुगीन भारतीय इतिहासाची साधने ओळखतो.
०२ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करतो.
०३ऐतिहासिक साधनांचे इतिहासलेखनातील महत्त्व ओळखतो.
०४ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे प्रयत्न करतो.
०५शिवपूर्वकाळातील भारतातील विविध सत्तांचे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर झालेले परिणाम सांगतो.
०६मुघलकालीन घटनांचे महाराष्ट्रावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करतो.
०७शिवपूर्वकालीन समाजजीवन स्पष्ट करतो.
०८
आदिलशाही व निजामशाही काळांतील विविध ऐतिहासिक घटना स्पष्ट करतो.
०९शिवपूर्वकालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीची कारणमीमांसा करतो.
१०संतांच्या शिकवणुर्कीतील साम्य शोधतो.
११स्वराज्यस्थापनेस कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली याची चिकित्सा करतो.
१२किल्ले/ऐतिहासिक वास्तू यांना भेट देऊन माहिती गोळा करतो.
१३किल्ल्यांची माहिती इंटरनेटच्या मदतीने मिळवतो.
१४ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी प्रयत्न करतो.
१५जावळीच्या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतो.
१६शिवाजी महाराजांचे सहकारी जीवाला जीव देणारे होते, याची जाणीव निर्माण होते.
१७शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास करतो.
१८मराठे व मुघल संघर्ष चिकित्सकपणे अभ्यासतो.
१९कठीण व अडचणीच्या प्रसंगी शिवरायांची निर्णयक्षमता व धैर्य यांचे अभ्यासपूर्ण विवेचन करतो.
२०शिवराज्याभिषेकामागील कारणे स्पष्ट करतो.



आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र

अ क्रआकारिक नोंदी
२१दक्षिण दिग्विजयानंतरचा स्वराज्याचा विस्तार नकाशाच्या मदतीने स्पष्ट करतो.
२२स्वराज्याच्या लोककल्याणकारी प्रशासन व्यवस्थेची माहिती सांगतो.
२३छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन व लष्करी व्यवस्था स्पष्ट करतो.
२४छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन इतर राजांची माहिती घेऊन महाराजांचे वेगळेपण ओळखतो.
२५शिवचरित्रातून प्रेरणा घेतो.
२६किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती तयार करतो.
२७छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची राज्यकारभाराची धोरणे बदलत गेली हे स्पष्ट करतो.
२८
मराठ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राज्य टिकवून ठेवले याची जाणीव आहे.
२९छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी जिंजीस हलवावी लागली, याची चिकित्सा करतो.
३०महाराणी ताराबाईंच्या कार्याचा विश्लेषणात्मक आढावा घेतो.
३१
मराठी सत्ता अखिल भारतीय पातळीवर प्रबळ सत्ता म्हणून उदयाला आली हे तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या मदतीने स्पष्ट करतो.
३२पानिपतच्या लढाईची कारणमीमांसा करतो.
३३पेशव्यांनी केलेल्या कार्याची माहिती करून घेतो.
३४मराठा सरदारांच्या कार्याचे महत्त्व सांगतो.
३५संविधान सभेच्या कार्यपद्धतीत विरोधी मतांचा उचित आदर केला गेल्याचे समजून घेतो.
३६संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे महत्त्व जाणतो.
३७न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांच्या आधारे नव्या समाजाची निर्मिती करणे हे संविधानाचे उ‌द्दिष्ट होते हे जाणतो.
३८लोकशाही मूल्यांनुसार आचरण करतो.
३९संविधानाच्या उद्दे‌शिकेतील मूल्ये मानवतावादी आहेत हे समजून घेतो.
४०सार्वभौमत्व संकल्पना समजून घेतो.

वर्णनात्मक नोंदी समाजशास्र विषय

अ क्रआकारिक नोंदी
४१
लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते हे जाणून घेतो.
४२लोकशाहीत निर्णय चर्चा-विचारविनिमयांच्या आधारे सामूहिकरीत्या घेतले जातात हे समजून घेतो.
४३संविधानाची वैशिष्ट्ये सांगतो.
४४लोकशाही शासनव्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगतो.
४५संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासनसंस्था काम करतात हे माहीत करून घेतो.
४६
संविधानात नमूद केलेल्या हक्कांना न्यायालयाचे विशेष संरक्षण असते हे जाणून घेतो.
४७मूलभूत हक्क सर्व पातळ्यांवरील शासनसंस्थांना बंधनकारक असतात हे सांगतो.
४८
कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात ही जाणीव आहे.
४९भारतातील धार्मिक विविधतेचा आदर करण्याची वृत्ती विकसित करतो.
५०सर्व अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी, साहित्य जतन करता येते हे जाणून घेतो.
५१
कोणत्याही व्यक्तीला विनाकारण बेकायदेशीर रीतीने अटक करून स्थानबद्ध करता येत नाही याविषयी माहिती करून घेतो.
५२मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित झालेल्या कायद्यांची सूची करतो.
५३मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयीन सरंक्षण नाही, परंतु ती शासनावर बंधनकारक आहेत हे समजून घेतो.
५४राष्ट्रीय चिन्हांविषयी आदर बाळगतो.
५५पर्यावरणाच्या रक्षणासाठी योग्य कृती करण्यात पुढाकार घेतो.
५६
स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती जोपासतो.
५७अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतो.
५८भारतीयत्वाची जाण आहे.
५९विशिष्ट प्रदेशाविषयीच्या माहितीचे संकलन व परीक्षण करतो.
६०भौगोलिक माहितीच्या आधारे किंवा त्याविषयी विविध प्रश्न विचारतो.


आकारिक नोंदी कला विषय

अ क्रआकारिक नोंदी
६१भौगोलिक संदर्भाचे परीक्षण केल्यानंतर विविध प्रश्न विचारतो.
६२भौगोलिक दृष्टिकोनातून नैसर्गिक घटना व त्यामागील कारणे समजून घेतो.
६३एखादया प्रदेशातील प्राकृतिक घटक ओळखणे व त्यांचे भानवावर होणारे परिणाम विशद करतो.
६४नकाशा व इतर भौगोलिक साधने वापरून एखादया प्रदेशासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देतो.
६५एखादया प्रदेशाच्या स्थानाबद्दलची उत्तरे देण्यासाठी नकाशा व इतर भौगोलिक साधनांचा उपयोग करतो.
६६नकाशा व इतर भौगोलिक साधने वापरून एखादया प्रदेशासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देतो.
६७एखादया प्रदेशातील प्राकृतिक घटक ओळखणे व त्यांचे भानवावर होणारे परिणाम विशद करतो.
६८
मानवी कृतीमुळे एखाद्या प्रदेशातील ठिकाणामध्ये काळानुसार बदल कसे घडत गेले याची नकाशा, प्रतिमा इ. भौगोलिक साधनांच्या साहाय्याने कारणमीमांसा करतो.
६९प्राकृतिक व मानवी वैशिष्ट्ये जाणून घेऊन समाजासाठी त्यांचे महत्त्व ठरवतो.
७०स्थळ, लोक/मानव आणि परिसर/पर्यावरण यांमधील समस्यांचा भौगोलिक घटकांच्या आधारे विचार करतो.
७१एखाद्या प्रदेशातील प्राकृतिक पर्यावरणाचा तेथील अर्थकारण संस्कृती व व्यापार यावर होणारा परिणाम सांगतो.
७२नकाशा व इतर भौगोलिक साधने वापरून एखादया प्रदेशासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देतो.
७३एखादया विशिष्ट प्रदेशाब‌द्दल प्रश्न तयार करता येणे व त्या संदर्भाने शोध घेतो.
७४मानवी वस्तीचे वितरण आणि मानवी क्रियांच्या प्रसारणाची प्रक्रिया यांचे आकृतिबंध लक्षात घेतो.
७५एखाद्या प्रदेशातील मानवी व प्राकृतिक रचनांमधील परस्पर संबंधांचे सकारात्मक व नकारात्मक परिणामांचे परीक्षण करतो.
७६वस्त्यांच्या निर्माणामध्ये मानवाने भौगोलिक घटकांचा कसा वापर केला, तसेच स्थानिक प्राकृतिक पर्यावरणाशी अनुकूलन व सुधारणा तो कशा करत गेला याचे परीक्षण करतो.
७७नकाशावरून भौगोलिक घटकांबद्दल अनुमान करणे व निष्कर्ष काढतो.
७८नकाशा व इतर भौगोलिक साधने वापरून एखादया प्रदेशासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देतो.


हे पण पहा :- क्रांती दिन

इयत्ता :- ८ वी [ समाजशास्र ]

आकारिक नोंदी समाजशास्र विषय

अ क्रआकारिक नोंदी
०१ इतिहासाची विविध साधने ओळखतो आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतो.
०२विविध स्रोत, विविध प्रदेशांसाठी उपयोगात आणली गेलेली नामावली आणि त्या त्या काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना यांच्या आधारे 'आधुनिक कालखंड', 'मध्ययुगीन कालखंड' आणि 'प्राचीन कालखंड' यांमधील फरक स्पष्ट करतो.
०३ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सर्वाधिक बलशाली सत्ता कशी बनली हे स्पष्ट करतो.
०४विविध प्रदेशांतील ब्रिटिश कृषी धोरणांमधील फरक स्पष्ट करून सांगतो
०५एकोणविसाव्या शतकातील आदिवासी समाजाच्या रचना आणि त्यांचे पर्यावरणाशी असलेले नाते यांचे वर्णन करतो.
०६आदिवासी समाजाच्या संदर्भातील ब्रिटिशांच्या प्रशासकीय धोरणांचे स्पष्टीकरण देतो.
०७१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा उगम, स्वरूप आणि विस्तार तसेच त्यापासून घेतलेला बोध यांचे स्पष्टीकरण देतो.
०८
ब्रिटिश सत्तेच्या काळात प्राचीन, नागरी व व्यापारी केंद्रे आणि हस्तव्यवसायावर आधारित उदयोग लयाला जाऊन नवीन नागरी व्यापारी केंद्रे आणि उ‌द्योगधंदे विकसित कसे झाले या गोष्टीचे विश्लेषण करतो.
०९भारतातील नवीन शिक्षणव्यवस्थेचे संस्थात्मीकरण कसे झाले हे स्पष्ट करतो.
१०जातिव्यवस्था, स्त्रियांचे स्थान, विधवांचा पुनर्विवाह, बालविवाह, सामाजिक सुधारणा आणि या प्रश्नांच्या संदर्भातील ब्रिटिश धोरणे आणि कायदे यांचे विश्लेषण करतो.
११कलेच्या क्षेत्रात आधुनिक काळात घडून आलेल्या प्रमुख घडामोडींची रूपरेषा सांगू शकतो.
१२सन १८७० ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातील वाटचालीचा आढावा घेतो.
१३राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेतील ठळक घटकांचे विश्लेषण करतो.
१४भारताच्या संविधानाच्या संदर्भात आपल्या प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय समस्यांचा अन्वयार्थ लावतो.
१५घटक राज्यशासन व केंद्रशासन यांत फरक करतो.
१६लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेचे वर्णन करतो.
१७राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभेच्या मतदारसंघ नकाशात स्वतःच्या मतदार संघाचे स्थान निश्चित करून स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे लिहितो.
१८कायदयाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन करतो.
१९घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा जाणतो.
२०माहितीच्या अधिकाराचा कायदा जाणतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र

अ क्रआकारिक नोंदी
२१शिक्षणाच्या हक्काचा कायदा जाणतो.
२२काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय सांगून त्याआधारे भारतातील न्यायालयीन व्यवस्थेचे कार्य स्पष्ट करतो.
२३'प्रथम माहिती अहवाल' कसा दाखल करावा याचे प्रात्यक्षिक दाखवतो.
२४आपल्या प्रदेशातील दुर्बल समाजधटकांना परिधाबाहेर का राहावे लागते त्या कारणांचे व परिणामांचे विश्लेषण करतो.
२५पाणी, सार्वजनिक स्वच्छता, रस्ते, वीज इत्यादी सार्वजनिक सुविधा पुरवण्यातील शासनाची भूमिका ओळखतो.
२६महाराष्ट्रातील शासनयंत्रणेचे स्वरूप स्पष्ट करतो.
२७पृथ्वीगोल व नकाशावरील रेखावृत्ते वापरून स्थानिक वेळ व प्रमाणवेळ काढतो.
२८
रेखावृत्तीय स्थानावरून प्रमाणवेळ व स्थानिक प्रमाणवेळ यांच्यातील सहसंबंधानुसार सहजतेने वापर करतो.
२९पृथ्वीच्या अंतरंगातील रचनेसंदर्भात आकृती/प्रतिकृती/प्रतिमा इत्यादींद्वारे स्पष्टीकरण करतो.
३०बाष्पीभवन व सांद्रीभवन या नैसर्गिक घटनांविषयी माहिती सांगतो.
३१
आर्द्रतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो.
३२ढगांचे प्रकार ओळखून पर्जन्याविषयी अंदाज व्यक्त करतो.
३३सागरी भूरूपे आकृतीवरून ओळखतो.
३४सागरी अवसादविषयी चर्चा करतो.
३५सागरी प्रवाह निर्मितीची कारणे स्पष्ट करतो.
३६सागरी प्रवाहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उदाहरणांसह स्पष्ट करतो.
३७ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक सांगतो.
३८नकाशातील भूमी उपयोजनावरून ग्रामीण व नागरी वस्त्यांची माहिती सादर करतो.
३९लोकसंख्या अभ्यासाचे महत्त्व सांगतो.
४०लोकसंख्येची रचना स्पष्ट करतो.

वर्णनात्मक नोंदी समाजशास्र विषय

अ क्रआकारिक नोंदी
४१
लोकसंख्येच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक सकारण सांगतो.
४२लोकसंख्येचे असमान वितरण समजण्यासाठी जगाच्या नकाशाचे वाचन करून स्पष्टीकरण करतो.
४३विविध उदद्योगांचे वर्गीकरण करतो.
४४उद्योगांचे महत्त्व सांगतो.
४५उद्योगाची सामाजिक बांधिलकी (C.S.R.) सांगतो.
४६
औदयोगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करतो.
४७उदधोग पूरक धोरणांची माहिती मिळवतो.
४८
दोन ठिकाणांमधील जमिनीवरील अंतर व नकाशातील अंतर यांवरून प्रमाण ठरवितो.
४९नकाशा प्रभाणासाठीच्या विविध प‌द्धती उदाहरणा‌द्वारे स्पष्ट करतो.
५०नकाशा प्रमाणावरून नकाशांचे प्रकार ओळखतो.
५१
नकाशा प्रमाणाचा प्रत्यक्ष वापर करतो.
५२क्षेत्रभेटीचे नियोजन करतो.
५३क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करतो.
५४मिळविलेल्या माहितीच्या आधारे क्षेत्रभेटीचा अहवाल सादर करतो.

Samajshastra (6 to 8) Akarik Mulymapan Nondi 761 KB


          तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी समाजशास्र | Akarik mulyamapan nondi Samajshastra pdf | Varnanatmak nondi pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी समाजशास्र  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad