१० सप्टेंबर दिनविशेष | 10 September Dinvishesh | 10 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 9, 2024

१० सप्टेंबर दिनविशेष | 10 September Dinvishesh | 10 September day special in Marathi

१० सप्टेंबर दिनविशेष

10 September Dinvishesh

10 September day special in Marathi

१० सप्टेंबर दिनविशेष | 10 September Dinvishesh | 10 September day special in Marathi

            १० सप्टेंबर दिनविशेष ( 10 September Dinvishesh | 10 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० सप्टेंबर दिनविशेष ( 10 September Dinvishesh | 10 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० सप्टेंबर दिनविशेष

10 September Dinvishesh

10 September day special in Marathi


@ जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन [World Suicide Prevention Day]

[इ.पू.२१०]=> चीनची पहिले सम्राट किन शी हुआंग यांचे निधन.

[१८४६]=> एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

[१८७२]=> कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात.

[१८८७]=> स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म.

[१८९२]=> नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.

[१८९५]=> कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.

[१८९८]=> लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.

[१९००]=> महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.

[१९१२]=> भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिने हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म.

[१९२३]=> बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन.

[१९३६]=> प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.

[१९३९]=> दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९४३]=> दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

[१९४८]=> नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म.


[१९४८]=> बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचे निधन.

[१९६४]=> व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.

[१९६६]=> पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

[१९६७]=> जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

[१९७५]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.

[१९७५]=> व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.

[१९८३]=> नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.

[१९८९]=> भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.

[१९९६]=> गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.

[२०००]=> भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन.

[२००१]=> मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.

[२००२]=> परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

[२००६]=> टोंगाचा राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.

Read Also :-  One Word Substitution

            तुम्हाला १० सप्टेंबर दिनविशेष | 10 September Dinvishesh | 10 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad