११ सप्टेंबर दिनविशेष | 11 September Dinvishesh | 11 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 10, 2024

११ सप्टेंबर दिनविशेष | 11 September Dinvishesh | 11 September day special in Marathi

११ सप्टेंबर दिनविशेष

11 September Dinvishesh

11 September day special in Marathi

११ सप्टेंबर दिनविशेष | 11 September Dinvishesh | 11 September day special in Marathi

            ११ सप्टेंबर दिनविशेष ( 11 September Dinvishesh | 11 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ११ सप्टेंबर दिनविशेष ( 11 September Dinvishesh | 11 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

११ सप्टेंबर दिनविशेष

11 September Dinvishesh

11 September day special in Marathi


राष्ट्रीय वन शहीद दिन [National Forest Martyrs Day]

[१२९७]=> स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.

[१७७३]=> बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

[१७९२]=> होप हिरा चोरला गेला.

[१८१६]=> जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.

[१८६२]=> इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.

[१८८४]=> भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म.

[१८८५]=> इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म.

[१८८८]=> अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

[१८९३]=> स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

[१८९५]=> भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म.

[१९०१]=> साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म.

[१९०६]=> म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

[१९११]=> भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म.

[१९१५]=> भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म.

[१९१७]=> फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म.

[१९१९]=> अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

[१९२१]=> तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन.

[१९३९]=> ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.

[१९४१]=> अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

[१९४२]=> आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.



[१९४४]=> दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

[१९४८]=> पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन.

[१९६१]=> विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

[१९६४]=> हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन.

[१९६५]=> भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

[१९७१]=> सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन.

[१९७२]=> नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

[१९७३]=> चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.

[१९७३]=> भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

[१९७६]=> भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.

[१९७८]=> बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

[१९८२]=> तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.

[१९८७]=> हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन.

[१९९३]=> चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.

[१९९७]=> नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

[१९९८]=> क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन.

[२००१]=> वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.

[२००७]=> रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

[२०११]=> भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.

Read Also :- Vegetables Names

            तुम्हाला ११ सप्टेंबर दिनविशेष | 11 September Dinvishesh | 11 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad