१२ सप्टेंबर दिनविशेष | 12 September Dinvishesh | 12 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 11, 2024

१२ सप्टेंबर दिनविशेष | 12 September Dinvishesh | 12 September day special in Marathi

१२ सप्टेंबर दिनविशेष

12 September Dinvishesh

12 September day special in Marathi

१२ सप्टेंबर दिनविशेष | 12 September Dinvishesh | 12 September day special in Marathi

            १२ सप्टेंबर दिनविशेष ( 12 September Dinvishesh | 12 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ सप्टेंबर दिनविशेष ( 12 September Dinvishesh | 12 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ सप्टेंबर दिनविशेष

12 September Dinvishesh

12 September day special in Marathi


@ आजोबांचा दिवस [Grandparents’ Day]

[१४९४]=> फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.

[१६६६]=> आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.

[१६८३]=> पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.

[१७९१]=> विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.

[१८१८]=> गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म.

[१८५७]=> कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.

[१८९४]=> जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म.

[१८९७]=> तिरह मोहिम: सारगढीची लढाई.

[१८९७]=> नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म.

[१९१२]=> इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म.

[१९१८]=> ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.

[१९१९]=> अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.

[१९२६]=> मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.

[१९३०]=> विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

[१९४८]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.

[१९४८]=> भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.


[१९५२]=> शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन.

[१९५९]=> ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.

[१९७१]=> शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन.

[१९७७]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.

[१९८०]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन.

[१९८०]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन.

[१९८०]=> तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.

[१९९२]=> हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन.

[१९९३]=> अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.

[१९९६]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन.

[१९९६]=> संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.

[१९९८]=> डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

[२००२]=> मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

[२००५]=> हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.

[२०११]=> न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

Read Also :- Birds Names

            तुम्हाला १२ सप्टेंबर दिनविशेष | 12 September Dinvishesh | 12 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad