१४ सप्टेंबर दिनविशेष | 14 September Dinvishesh | 14 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 13, 2024

१४ सप्टेंबर दिनविशेष | 14 September Dinvishesh | 14 September day special in Marathi

१४ सप्टेंबर दिनविशेष

14 September Dinvishesh

14 September day special in Marathi

१४ सप्टेंबर दिनविशेष | 14 September Dinvishesh | 14 September day special in Marathi

            १४ सप्टेंबर दिनविशेष ( 14 September Dinvishesh | 14 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ सप्टेंबर दिनविशेष ( 14 September Dinvishesh | 14 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ सप्टेंबर दिनविशेष

14 September Dinvishesh

14 September day special in Marathi


@ हिंदी दिवस [Hindi Diwas]

[ई.पू. ८९१]=> पोप स्टीफन (पाचवा) यांचे निधन.

[७८६]=> हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.

[१७१३]=> जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म.

[१७७४]=> भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म.

[१८६७]=>वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म.

[१८९३]=> सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

[१८९७]=> नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म.

[१९०१]=> अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन.

[१९०१]=> शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.

[१९१७]=> रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

[१९२१]=> शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म.

[१९२३]=> केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.

[१९३२]=> रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म.

[१९४८]=> ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.

[१९४८]=> दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.

[१९४९]=> हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.



[१९५७]=> दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.

[१९५९]=> सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

[१९६०]=> ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.

[१९६३]=> अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

[१९७८]=> व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

[१९७९]=> अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी यांचे निधन.

[१९८९]=> भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन.

[१९९५]=> संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

[१९९७]=> बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.

[१९९८]=> शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.

[१९९९]=> किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

[२०००]=> मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.

[२००३]=> इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

[२०११]=> कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन.

[२०१५]=> सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन.

Read Also :- Reptiles Names

            तुम्हाला १४ सप्टेंबर दिनविशेष | 14 September Dinvishesh | 14 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad