१५ सप्टेंबर दिनविशेष | 15 September Dinvishesh | 15 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 14, 2024

१५ सप्टेंबर दिनविशेष | 15 September Dinvishesh | 15 September day special in Marathi

१५ सप्टेंबर दिनविशेष

15 September Dinvishesh

15 September day special in Marathi

१५ सप्टेंबर दिनविशेष | 15 September Dinvishesh | 15 September day special in Marathi

            १५ सप्टेंबर दिनविशेष ( 15 September Dinvishesh | 15 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १५ सप्टेंबर दिनविशेष ( 15 September Dinvishesh | 15 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१५ सप्टेंबर दिनविशेष

15 September Dinvishesh

15 September day special in Marathi


आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन [International Day of Democracy]

अभियंता दिवस [Engineer's Day]

[१२५४]=>
 इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म.

[१८१२]=> नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.

[१८२१]=> कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.

[१८३५]=> चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.

[१८६१]=> भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म.

[१८७६]=> बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म.

[१८८१]=> इटालियन ऑटोमोबाइल अभियंते एत्तोरे बुगाटी यांचा जन्म.

[१८९०]=> इंग्लिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांचा जन्म.

[१९०५]=> नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म.

[१९०९]=> तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म.

[१९०९]=> स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म.

[१९१६]=> पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.

[१९२१]=> रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म.

[१९२६]=> विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.

[१९३५]=> जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.



[१९३५]=> भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.

[१९३५]=> सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म.

[१९३९]=> अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

[१९४६]=> दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच माईक प्रॉक्टर यांचा जन्म.

[१९४८]=> एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

[१९४८]=> भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.

[१९५३]=> श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

[१९५९]=> निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.

[१९५९]=> प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

[१९६८]=> सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

[१९७८]=> तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

[१९८९]=> न्यूझीलंडचा संगीतकार चेतन रामलू यांचा जन्म.

[१९९८]=> गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.

[२०००]=> ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.

[२००८]=> लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.

[२००८]=> साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन.

[२०१२]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन.

[२०१३]=> निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

Read Also :- Vehicles Names

            तुम्हाला १५ सप्टेंबर दिनविशेष | 15 September Dinvishesh | 15 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad