१६ सप्टेंबर दिनविशेष | 16 September Dinvishesh | 16 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 15, 2024

१६ सप्टेंबर दिनविशेष | 16 September Dinvishesh | 16 September day special in Marathi

१६ सप्टेंबर दिनविशेष

16 September Dinvishesh

16 September day special in Marathi

१६ सप्टेंबर दिनविशेष | 16 September Dinvishesh | 16 September day special in Marathi

            १६ सप्टेंबर दिनविशेष ( 16 September Dinvishesh | 16 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ सप्टेंबर दिनविशेष ( 16 September Dinvishesh | 16 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ सप्टेंबर दिनविशेष

16 September Dinvishesh

16 September day special in Marathi


इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस [International Day for Interventional Cardiology]

ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस [International Day for the Preservation of the Ozone Layer]

[१३८०]=>
 फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचा जन्म.

[१३८६]=> इंग्लंडचा राजा हेन्‍री (पाचवा) यांचा जन्म.

[१६२०]=> मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.

[१७३६]=> जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन.

[१८२४]=> फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन.

[१८५३]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.

[१८८८]=> बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म.

[१९०७]=> जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म.

[१९०८]=> जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

[१९१३]=> रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म.

[१९१६]=> विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म.

[१९२३]=> सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म.

[१९२५]=> आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.

[१९३२]=> हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन.

[१९३५]=> इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.

[१९४२]=> निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.

[१९५४]=> सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.

[१९५६]=> अमेरिकन जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांचा जन्म.

[१९६३]=> झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.

[१९६३]=> मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.

[१९६५]=> अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन.

[१९७३]=> पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.



[१९७५]=> पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.

[१९७७]=> हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन.

[१९८४]=> बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन.

[१९८७]=> ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.

[१९९४]=> साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन.

[१९९७]=> आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.

[१९९७]=> निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.

[२००५]=> लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन.

[२०१२]=> आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन.

Read Also :- Subjects Names

            तुम्हाला १६ सप्टेंबर दिनविशेष | 16 September Dinvishesh | 16 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad