२० सप्टेंबर दिनविशेष | 20 September Dinvishesh | 20 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 19, 2024

२० सप्टेंबर दिनविशेष | 20 September Dinvishesh | 20 September day special in Marathi

२० सप्टेंबर दिनविशेष

20 September Dinvishesh

20 September day special in Marathi

२० सप्टेंबर दिनविशेष | 20 September Dinvishesh | 20 September day special in Marathi

            २० सप्टेंबर दिनविशेष ( 20 September Dinvishesh | 20 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० सप्टेंबर दिनविशेष ( 20 September Dinvishesh | 20 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० सप्टेंबर दिनविशेष

20 September Dinvishesh

20 September day special in Marathi


[१६३३]=> पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.

[१८१०]=> ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.

[१८५३]=> थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म.

[१८५७]=> १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

[१८९७]=> मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म.

[१९०९]=> गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.

[१९११]=> भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म.

[१९१३]=> कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

[१९१३]=> वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

[१९१५]=> विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण.

[१९२१]=> क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.

[१९२२]=> चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

[१९२३]=> भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म.

[१९२५]=> थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म.

[१९२८]=> केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.



[१९३३]=> विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन.

[१९३४]=> इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.

[१९३४]=> भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म.

[१९४४]=> क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.

[१९४६]=> पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.

[१९४६]=> भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

[१९४९]=> चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.

[१९७३]=> टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.

[१९७७]=> व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९७९]=> चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.

[१९९६]=> कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.

[१९९७]=> चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन.

[२००१]=> अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

[२०१५]=> भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन.

Read Also :- House Related Names

            तुम्हाला २० सप्टेंबर दिनविशेष | 20 September Dinvishesh | 20 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad