३ सप्टेंबर दिनविशेष | 3 September Dinvishesh | 3 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 2, 2024

३ सप्टेंबर दिनविशेष | 3 September Dinvishesh | 3 September day special in Marathi

३ सप्टेंबर दिनविशेष

3 September Dinvishesh

3 September day special in Marathi

३ सप्टेंबर दिनविशेष | 3 September Dinvishesh | 3 September day special in Marathi

            ३ सप्टेंबर दिनविशेष ( 3 September Dinvishesh | 3 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३ सप्टेंबर दिनविशेष ( 3 September Dinvishesh | 3 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३ सप्टेंबर दिनविशेष

3 September Dinvishesh

3 September day special in Marathi


@ गगनचुंबी इमारत दिवस [Skyscraper Day]

[ई.पू. ३०१]=> जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.

[१६५८]=> इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.

[१७५२]=> अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

[१८५५]=> आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म.

[१८६९]=> सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म.

[१८७५]=> पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या यांचा जन्म.

[१९०५]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.

[१९१६]=> श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.

[१९२३]=> टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म.

[१९२३]=> प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म.

[१९२३]=> महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.

[१९२७]=> बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म.

[१९३१]=> नाटककार श्याम फडके यांचा जन्म.

[१९३५]=> सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.


[१९३८]=> नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.

[१९४०]=> लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.

[१९४८]=> चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.

[१९५३]=> तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.

[१९५६]=> भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म.

[१९५८]=> निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन.

[१९६५]=> अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म.

[१९६७]=> वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन.

[१९७१]=> कतारला स्वातंत्र्य मिळाले.

[१९७१]=> भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.

[१९७४]=> भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म.

[१९७६]=> चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.

[१९९१]=> अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन.

[२०००]=> स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन.

Read Also :-  Homophones

            तुम्हाला ३ सप्टेंबर दिनविशेष | 3 September Dinvishesh | 3 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad