५ सप्टेंबर दिनविशेष | 5 September Dinvishesh | 5 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 4, 2024

५ सप्टेंबर दिनविशेष | 5 September Dinvishesh | 5 September day special in Marathi

५ सप्टेंबर दिनविशेष

5 September Dinvishesh

5 September day special in Marathi

५ सप्टेंबर दिनविशेष | 5 September Dinvishesh | 5 September day special in Marathi

            ५ सप्टेंबर दिनविशेष ( 5 September Dinvishesh | 5 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ५ सप्टेंबर दिनविशेष ( 5 September Dinvishesh | 5 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

५ सप्टेंबर दिनविशेष

5 September Dinvishesh

5 September day special in Marathi


आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन [International Day of Charity]

@ राष्ट्रीय शिक्षक दिन [National Teacher's Day]


[११८७]=> फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म.

[१६३८]=> फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म.

[१८७२]=> भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म.

[१८७६]=> चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन.

[१८७७]=> अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

[१८८८]=> भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म.

[१८९५]=> भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म.

[१९०६]=> ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन.

[१९०७]=> शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म.

[१९१०]=> भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

[१९१८]=> उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन.

[१९२०]=> बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म.

[१९२८]=> सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी.

[१९३२]=> बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

[१९४०]=> अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

[१९४१]=> इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

[१९४६]=> मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

[१९५४]=> वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

[१९६०]=> रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

[१९६१]=> अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

[१९६७]=> ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.


[१९७०]=> इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

[१९७२]=> ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

[१९७५]=> अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

[१९७७]=> व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

[१९७८]=> कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

[१९८४]=> एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

[१९८६]=> भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

[१९९१]=> हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन.

[१९९२]=> उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

[१९९५]=> हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन.

[१९९६]=> भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन.

[१९९७]=> नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन.

[२०००]=> ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

[२०००]=> वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन.

[२००५]=> इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

[२०१५]=> भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन.

Read Also :-  Add a Question Tag

            तुम्हाला ५ सप्टेंबर दिनविशेष | 5 September Dinvishesh | 5 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad