६ सप्टेंबर दिनविशेष | 6 September Dinvishesh | 6 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 5, 2024

६ सप्टेंबर दिनविशेष | 6 September Dinvishesh | 6 September day special in Marathi

६ सप्टेंबर दिनविशेष

6 September Dinvishesh

6 September day special in Marathi

६ सप्टेंबर दिनविशेष | 6 September Dinvishesh | 6 September day special in Marathi

            ६ सप्टेंबर दिनविशेष ( 6 September Dinvishesh | 6 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ सप्टेंबर दिनविशेष ( 6 September Dinvishesh | 6 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ सप्टेंबर दिनविशेष

6 September Dinvishesh

6 September day special in Marathi


[१५२२]=> फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

[१७६६]=> इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म.

[१८८८]=> चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

[१८८९]=> स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म.

[१८९२]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.

[१९०१]=> भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म.

[१९२१]=> बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म.

[१९२३]=> युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

[१९२९]=> हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म.

[१९३८]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

[१९३९]=> दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९५२]=> कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.


[१९५७]=> पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

[१९६३]=> कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन.

[१९६५]=> पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

[१९६६]=> दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

[१९६८]=> पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.

[१९६८]=> स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

[१९७१]=> भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.

[१९७२]=> जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.

[१९९०]=> इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन.

[१९९३]=> ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

[१९९७]=> अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

[२००७]=> इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.

Read Also :-  Compound Words

            तुम्हाला ६ सप्टेंबर दिनविशेष | 6 September Dinvishesh | 6 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad