८ सप्टेंबर दिनविशेष | 8 September Dinvishesh | 8 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 7, 2024

८ सप्टेंबर दिनविशेष | 8 September Dinvishesh | 8 September day special in Marathi

८ सप्टेंबर दिनविशेष

8 September Dinvishesh

8 September day special in Marathi

८ सप्टेंबर दिनविशेष | 8 September Dinvishesh | 8 September day special in Marathi

            ८ सप्टेंबर दिनविशेष ( 8 September Dinvishesh | 8 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ सप्टेंबर दिनविशेष ( 8 September Dinvishesh | 8 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ सप्टेंबर दिनविशेष

8 September Dinvishesh

8 September day special in Marathi


आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस [International Literacy Day]

जागतिक शारीरिक थेरपी दिन [World Physical Therapy Day]

[ई पू. ७०१]=>
 पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन.

[११५७]=> इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म.

[१८३०]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

[१८३१]=> विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.

[१८४६]=> भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म.

[१८४८]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म.

[१८५७]=> ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

[१८८७]=> योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म.

[१९००]=> अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.

[१९०१]=> दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.

[१९१८]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

[१९२५]=> इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म.

[१९२६]=> संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म.

[१९३३]=> इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.

[१९३३]=> जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.

[१९५४]=> साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.


[१९६०]=> इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन.

[१९६२]=> स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

[१९६५]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.

[१९६६]=> स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

[१९७०]=> मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन.

[१९८०]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.

[१९८१]=> अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन.

[१९८१]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.

[१९८२]=> जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन.

[१९९१]=> कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन.

[१९९१]=> मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.

[२०००]=> सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.

[२००१]=> लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.

[२०१०]=> कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन.

Read Also :-  Opposite Words

            तुम्हाला ८ सप्टेंबर दिनविशेष | 8 September Dinvishesh | 8 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad