९ सप्टेंबर दिनविशेष | 9 September Dinvishesh | 9 September day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 8, 2024

९ सप्टेंबर दिनविशेष | 9 September Dinvishesh | 9 September day special in Marathi

९ सप्टेंबर दिनविशेष

9 September Dinvishesh

9 September day special in Marathi

९ सप्टेंबर दिनविशेष | 9 September Dinvishesh | 9 September day special in Marathi

            ९ सप्टेंबर दिनविशेष ( 9 September Dinvishesh | 9 September day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ सप्टेंबर दिनविशेष ( 9 September Dinvishesh | 9 September day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ सप्टेंबर दिनविशेष

9 September Dinvishesh

9 September day special in Marathi


तेलंगणा भाषा दिन [Telangana Language Day]

@ स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू [Freedom fighter Shirish Kumar died due to bullet injury]


[१४३८]=> पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन.

[१५४३]=> नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

[१७९१]=> वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

[१८२८]=> रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म.

[१८३९]=> जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

[१८५०]=> आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म.

[१८५०]=> कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

[१८९०]=> केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म.

[१९०४]=> भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म.

[१९०५]=> भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म.

[१९०९]=> अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म.

[१९१०]=> गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म.

[१९३९]=> प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

[१९४१]=> अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

[१९४१]=> सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म.

[१९४२]=> स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू.

[१९४५]=> दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.


[१९५०]=> संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.

[१९६०]=> उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन.

[१९७४]=> कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.

[१९७६]=> आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन.

[१९७८]=> वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन.

[१९८५]=> मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

[१९९०]=> श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

[१९९१]=> ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

[१९९४]=> लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

[१९९७]=> ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

[१९९७]=> युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

[१९९९]=> नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

[२००१]=> अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या.

[२००१]=> व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

[२००९]=> ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.

[२०१०]=> समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन.

[२०१२]=> भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.

[२०१२]=> भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन.

[२०१५]=> एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

[२०१६]=> उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.

Read Also :-  Silent Letters

            तुम्हाला ९ सप्टेंबर दिनविशेष | 9 September Dinvishesh | 9 September day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad