बालदिन भाषण मराठी - पंडित जवाहरलाल नेहरू
Children's Day Speech in Marathi
Bal Din Bhashan Marathi
Pandit Jawaharlal Nehru Jayanti
बालदिन भाषण - पंडित जवाहरलाल नेहरू जयंती | Children's Day Speech in Marathi | Bal Din Bhashan Marathi - Pandit Jawaharlal Nehru Jayanti ) येथे देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
बालदिन ( Children's Day | Bal Din ) हा दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरूंच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो. यामागचे कारण म्हणजे त्यांचे लहान मुलांवरील असलेले प्रेम होय. पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्य लढा देत असताना अनेक वेळा तुरुंगात जावे लागे अश्याच एका वेळी त्यांना तुरुंगावास झाला तेव्हा त्यानी त्यांची मुलगी इंदिरा यांना पत्र लिहिले त्यात त्यांनी बालशिक्षणाविषयी विचार मांडले त्यात त्यांनी मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार चांगले मिळातात की नाही हे शिक्षक व पालक यांनी पाहिले पाहिजे तसेच मुलांना 'देवाघरची फुले' समजली पाहिजेत ती बागेतल्या फुलांच्या कळीप्रमाणे असतात. त्यांना प्रेमाने व काळजीने हाताळली पाहिजेत; कारण बालकांमध्येच देशाचे भवितव्य दडलेले आहे तेच देशाची खरी शक्ती व समाज उभारणीचा पाया बालकेच असतात, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत असे. पंडित नेहरूंनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले कारण त्यांना माहित होते की हे देशाचे भविष्य आहे म्हणून त्यांचे पालन पोषण व शिक्षण योग्य प्रकार व्हायला हवे तेव्हाच ते उद्याचा भारत निर्माण करू शकतील ते आपल्या देशाची मोल्यवान संपती आहे.
पं. नेहरूंना गुलाबाचे फुल फार आवडायचे त्यामुळे त्याच्या कोटला नेहमी लाल गुलाबाचे फुल असे तसेच त्यांना गुलाबांच्या फुलांची जितकी आवड होती, तितकीच लहान मुला बददल होती. त्यांना जसे लहान मुळे आवडायची तसेच लहान मुलांना देखील पंडित नेहरू आवडायचे. लहान मुले त्याना चाचा नेहरू म्हणत. पंडित नेहरूंना लहान मुलांबरोबर वेळ घालवायला फार आवडे ते वेळात वेळ काढून लहान मुलांबरोर आपला वेळ घालवत. एकदा मुंबईला शिवाजी पार्कवर दीड लाख मुलांचा एक मेळावा भरला होता. त्यावेळी मुलांनी त्यांना बोलावले होते. पंडित नेहरूनी इतर कार्यक्रम रद्द केले व मुलांच्या समारभांला अगत्याने आले. काही वेळा लहान मुले त्यांच्या गळ्यात हार घालायला जात. या छोट्या मुलांचे हात त्यांच्या गळ्यापर्यंत कसे पोहोचणार? पंडितजी एकेका मुलाला अलगद उचलून घेत. त्यांच्या पुढे आपली मान वाकवित. मुले त्यांच्या गळ्यात हार घालीत व टाळ्या वाजावित. त्या आनंदाने नेहरूही आनंदित होत. पंडित नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेबरला झाला. प्राथमिक शाळेतील मुले 'बालदिन' या नावाचा एक उपक्रम साजरा करतात, तो १४ नोव्हेंबर या दिवशीच केला जातो. त्यांच्यावरिल अलोट प्रेमाचेच ते प्रतीक आहे. आजही सर्व शाळांमधून या दिवशी नेहरूंच्या प्रतिमेला हार घालतात, प्रार्थना करतात, मिरवणूक काढतात. असा हा मुलांच्या उत्साहाचा व आनंदाचा दिवस.
हे पण पहा :- राष्ट्रीय गणित दिन भाषण
जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे. एका सुसंस्कृत व सधन कुटुबांत झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातील एक ख्यातनाम वकील होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही महत्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारे जवाहरलाल नेहरू यांच्यावर राजकारणाचे व सार्वजनिक कार्याचे संस्कार घरातूनच झाले होते. त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा कौटुंबिक वारसाच होता. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरी अलाहाबाद येथे झाले. पुढे ते शिक्षणसाठी इंग्लंड व नंतर केंब्रिजला गेले. सन १९१२ मध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले.
भारतात परतल्यावर नेहरूंनी अलाहाबाद येथे वकिली सुरु केली. परंतु लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काही काळ त्यांनी 'होमरूल लीग' या संघटनेचे कार्य केले. पुढे ते महात्मा गांधीजीच्या सहवासात आले. गांधीजीच्या व्यक्तिमत्वाने ते अत्यंत प्रभावित झाले आणि गांधीजीचे परम भक्त व लाडके शिष्य बनले. अर्थात, गांधीवादातील काही तत्त्वावर नेहरूंचा विश्वास असला तरी ते खऱ्या अर्थाने गांधीवादी मात्र कधीच झाले नाहीत. सन १९२० नंतरच्या काळातील भारतीय राजकारणावर व स्वातंत्र्य आंदोलनावर महात्मा गांधीचा सर्वाधिक प्रभाव असला तरी पंडित नेहरूंनीही या काळात स्व:तचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस हे भारतीय युवक वर्गाच्या इच्छा-आकाक्षांचे प्रतीकच बनले होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात या दोघानींही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याबदल त्यांनी अनेक वेळा कारावासही भोगला होता. सन १९२० मध्ये नेहरूंनी सोव्हियत युनियनला भेट दिली. समाजवादाच्या प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि समाजवादी विचारांकडे आकर्षित झाले. डिसेंबर, १९२९ मध्ये लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेहरूंची निवड झाली होती. याच अधिवेशनात ३१ डिसेंबर, १९२९ रोजी काँग्रेसने प्रथमच समाजवादा वरील आपला विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची चार वेळा निवड झाली होती.
ऑगस्ट १९४२ च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात 'चले जाव' चा ठराव संमत होण्यात नेहरूंचा प्रमुख वाटा होता. त्यानंतर लगेचच इंग्रज सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. जवाहरलालजी आता राजकारणात समरस झाले. भारत-मातेची पारतंत्र्यातून मुक्तता करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. ते एकटे काहीच करु शकत नसले, तरी त्या सिद्धतेसाठी अनेक तरुण पुढे आले होते, मारू किंवा मरू हीच त्यांची प्रतिज्ञा होती. अशातच जवाहरलालजी चे वडील मोतीलाल यांचा उतारवयात आजरपणात सन १९३१ मध्ये मृत्यू झाला. हे मोठे दुःख देखील त्यांनी पचवले व मन खंबीर करून पुढे कार्य सुरु ठेवले.
जवाहरलालजी हे इंग्रज सरकारच्या दृष्टी पुढचे एक विरोधी सावज म्हणूनच वावरत होते. कुठे सत्याग्रह केल्याबद्दल, कुठे विरोधी लेख लिहिल्याबद्दल, कुठे सरकारविरुद्ध भाषणे करून जनतेमध्ये प्रक्षोभ उठविल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना तुरुगांची वाट दाखवून अडकवून ठेवण्याची त्यांची सतत तयारी असे. जवाहरलाल यांच्या पत्नी कमलाने राजकारणात पतीबरोबर थोडाफार भाग घेतला व त्याचा परिणाम म्हणून तिलाही कारावासात जावे लागले. पण त्याबद्दल तिला मुळीच वाईट वाटले नव्हते. कारावासातील दगदगीमुळे कमला नेहरूंची प्रकृती एकदा खूप बिघडली होती. त्यावेळी जवाहरलालजी तुरुंगात होते. त्यांच्या निकटच्या परिचितांनी पं. नेहरूंची सुटका करण्याची विनंती केली. त्यावेळी एका अटीवर सरकार त्यांना सोडण्यास तयार झाले होते! यापुढे जवाहरलालजी राजकारणात किंवा सरकारच्या विरोधात भाग घेणार नसतील, तर त्यांची सुटका करण्याचा विचार करू! ही ती अट. पंडितजीनी ती अट मुळीच मान्य केली नाही. माझ्या तत्वापासून मी रेसभरही मागे फिरणार नाही असा निग्रही विचार त्यांनी सरकारला कळवला होता. सरकार शांत झाले.
हे पण पहा :- आंतरराष्ट्रीय हिंदी दिन
भारतात सायमन साहेब आले पण येथील पुढाऱ्यानी त्यांना 'सायमन परत जा' असा विरोध केला व त्यात पंडितजी देखील होते. तो परत मायदेशी गेल्यावर त्यांनी भारतातील जनतेचा असंतोष तेथील वरिष्ठांना सांगितला. मध्यंतरीच्या काळात रँडसाहेब, जॅक्शन, वायली साहेब यांच्या सारख्यांना भारतीय क्रांतीकारांनी यमलोकी पाठविल्याचेही तेथील अधिकारी विसरले नव्हते. आता आपला हेका सोडला नाही, तर पुढे काय अनिष्ट परिणाम सोसावे लागलीत यांचीची त्यांना जाणीव झाली होती. सुमारे दिडशे वर्षे भारतावर त्यांनी सत्ता गाजवली, पण आताचा काळ अधिक बिथरला होता.
महात्मा गांधीचा असहकार व सत्याग्रह यांचाही विचार केल्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. पं. जवाहरलाल व त्यांचे साथीदार यांचा कडवा विरोध व त्यांची स्वातंत्र्याची मागणी जोर धरुन ते सर्व पुढची वाटचाल करीत होते. १९४२ च्या ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला महात्माजींनी 'चले जाव' असा इशारा इंग्रज सरकारला दिला होताच! चले जाव म्हणजे सर्व इंग्रजांनी भारत सोडून जावे व भारताला स्वातंत्र्य बहाल करावे, हाच तो संदेश होता.. त्यात पंडित नेहरूही सहभागी होते. ९ ऑगस्ट हा अजूनही क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीचा काळ संपला होता व १५ ऑगस्टच्या दिवसाला सुरुवात होत होती. रात्रीचे बारा वाजून गेले होते. सर्व पुढारी व जनता तो पर्यंत जागीच राहीली होती..
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सर्व पुढारी व तेथील जनता उपस्थित होती. बारा वाजून गेल्यावर त्या किल्ल्यावरचे इंग्रजी निशान युनियन जॅक खाली घेतले गेले. व भारताचा तिरंगा झेंडा डौलाने वर चढला. भारत स्वतंत्र झाल्याचा जयघोष सर्व लोकांच्या कानात घुमला व त्या आनंदात सर्व लोक गढून गेले. अशा तऱ्हेन भारत स्वतंत्र करण्यासाठी पं. जवाहरलालजीचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्य सूर्याच्या प्रकाशातच सर्व पुढाऱ्यांनी पं. नेहरू यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. पं. नेहरू यांनी ती मान्य केली व जबाबदारी स्वीकारली. पं. नेहरूंना हा बहुमान मिळाला होता. अशा तऱ्हेने ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी १६ वर्ष अतिशय उत्तम प्रकारे भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. परंतु दिनांक २७ मे १९६४ रोजी दुपारी २.३० वाजता त्यांचे निधन झाले.
अशा महान नेत्यास माझे कोटी-कोटी प्रणाम. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद.
हे पण वाचा :- महात्मा गांधी भाषण
हे पण वाचा :- महात्मा गांधी भाषण
तुम्हाला बालदिन भाषण - पंडित जवाहरलाल नेहरू ( Children's Day Speech in Marathi | Bal Din Bhashan Marathi - Pandit Jawaharlal Nehru ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला बालदिन भाषण - पंडित जवाहरलाल नेहरू ( Children's Day Speech in Marathi | Bal Din Bhashan Marathi - Pandit Jawaharlal Nehru ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box