उपमुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Vice Principal - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 16, 2024

उपमुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Vice Principal

उपमुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या

Duties and Responsibilities of Vice Principal

उपमुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Vice Principal

            माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील या पदास उपमुख्याध्यापक (उच्च माध्यमिक) व पदवी महाविद्यालयास जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील या पदास उपप्राचार्य (उच्च माध्यमिक) असे संबोधण्यात यावे.

            आठ किंवा आठपेक्षा अधिक तुकड्या असल्यास प्रत्येकी एक उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य पद.

            उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य पदावरील व्यक्तीस (शिक्षकास) त्यांच्या वैयक्तिक कार्यभारामध्ये १० घड्याळी तासांची सूट देण्यात यावी. या पदावरील व्यक्तीने वैयक्तिक कार्यभाराच्या मर्यादेस अधीन राहून स्वतःच्या विषयाच्या अध्यापनाची जबाबदारी सांभाळून उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य या पदांची शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी सांभाळावी. या पदाची शैक्षणिक कर्तव्ये आणि प्रशासकीय कर्तव्ये व अधिकार सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे राहतील.


परिशिष्ट "अ"

उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य या पदांची कर्तव्ये व अधिकार

Duties and Powers of Deputy Principal / Vice Principal)


अ] उपमुख्याध्यापक शैक्षणिक कर्तव्ये (Vice Principal Academic Duties) :


अ क्रउपमुख्याध्यापक शैक्षणिक कर्तव्ये
उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सक्षमपणे व प्रभावीपणे होण्यासाठी प्रयत्न करणे व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा राखण्यास मदत करणे. 
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अध्यापनाचे निरीक्षण करणे व निरीक्षण नोंदवही व अन्य अभिलेख ठेवणे व शिक्षकांच्या दैनिक टाचणांची नियतकालिक तपासणी करणे.
शासनाने तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी नियुक्त केले गेल्यास परीक्षाचालक किंवा परीक्षा उपसंचालक किंवा पर्यवेक्षक किंवा परीक्षक व नियामक म्हणून कामे पाहाणे आणि संबंधित परीक्षेसाठी विहित केलेल्या नियमानुसार कार्य व शिस्तपालन करणे, सोपविलेले परीक्षापूर्व व परीक्षोत्तर सर्व प्रकारचे कामकाज पाहणे.


हे पण पहा :- मराठी बोधकथा

ब] उपप्राचार्य प्रशासकीय कर्तव्ये (Vice Principal Administrative Duties)


अ क्रउपप्राचार्य प्रशासकीय कर्तव्ये
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे कामाचे दिवस व सुट्ट्या यांची संख्या निश्चित करून दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील वेळापत्रक तयार करणे व मुख्याध्यापक/प्राचार्यांना मदत करणे.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे कामाचे दिवस व सुट्टया यांची संख्या निश्चित करून दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील वेळापत्रक तयार करणे व मुख्याध्यापक/प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थी प्रवेशाचे काम पाहणे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील नोंदवही व अभिलेख योग्य प्रकारे ठेवण्यास जबबदार राहणे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्तणूक व शिस्त जोपासण्यास मदत करणे.
प्राचार्य/मुख्याध्यापक देईल अशा सूचनांच्या अधीनतेने आपल्या अखत्यारितील शिक्षकांनी केलेल्या कार्याचे पर्यवेक्षण करणे, त्यांच्या वर्तणूक, शिस्त आणि सेवाशर्तीचे पालन आणि कार्यक्षमता यासाठी जबाबदार राहणे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या कामाचा आढावा मुख्याध्यापक/प्राचार्य यांना वेळोवेळी सादर करणे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील पत्रव्यवहारास मुख्याध्यापक प्राचार्य यांना मदत करणे.


ब] उपप्राचार्य अधिकार (Vice Principal Powers)


            उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना व नैमित्तिक रजा मंजूर करणे व कार्य मुदतीच्या रजेसंबंधी मुख्याध्यापक/प्राचार्य यांना शिफारस करणे, (शा.नि.क्र. एसएसपी १३९६ // १२००/९६) उमाही-१ दि. ५-८-१९९७)

तसेच परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाराव्यतिरिक्त पुढील प्रमाणे जादा अधिकार उपमुख्याध्यापक/उपप्राचार्यांना देण्यात येत आहेत.

अ क्रउपप्राचार्य अधिकार
उच्च माध्यमिक/कनिष्ठ/महाविद्यालयीन शिक्षकाचे मासिक पगारपत्रक उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य यांच्या सहीने पाठविणे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांनी शैक्षणिक किंवा प्रशासकीय कार्यात कसूर केल्यास संबंधित शिक्षकांचा योग्य तो लेखी खुलासा उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य यांनी घेणे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षक मान्यता प्रस्ताव उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य यांच्या सहीने पाठविणे.
संबंधित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामासंबंधी योग्य ते आदेश उपमुख्याध्यापक/उपप्रासाचर्य यांनी देणे.


उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य यांना वरील अधिकार देण्यात आले तरी हे मूळ अधिकार मुख्याध्यापक/प्राचार्य यांचे असल्यामुळे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या संमतीने अधिकारितेचा उपयोग करण्यात यावा.


शाळेचे संस्था संचालक-अपेक्षा


अ क्रशाळेचे संस्था संचालक-अपेक्षा
शैक्षणिक संस्था ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्ननीमाटी आहे, अशी त्याची भावना असावी.
शाळेला आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्याचा कल असावा.
शाळेच्या वर्गखोल्या व परिसर सर्व सोयींनी युक्त असावा.
वाचनालयाची व्यवस्था असावी, त्यात अद्ययावत तथा प्राचीन शैक्षणिक साहित्याची सतत भर पडेल याकडे अधिक लक्ष दिले जावे.
विद्यार्थी, शिक्षक, पालक व मुख्याध्यापक यांच्या प्रसन्नतेकडे अधिक लक्ष पुरवावे.
सर्वांशी त्यांचे आत्मियतेचे पारिवारिक संबंध असावेत.
त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न असावा.

शाळेची सर्व दृष्टीने गुणवत्ता वाढेल याचा प्रयत्न असावा.
आवश्यक त्या सर्व शैक्षणिक साधनांची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न असावा.
१०संस्था व शाळा यात पारदर्शकता ठेवली जावी.
११शाळेच्या उपक्रमशीलतेला अधिक प्रोत्साहन द्यावे.
१२समाजात शाळेसंबंधी आत्मियना व प्रेम निर्माण करण्याकडे अधिक लक्ष दिले जावे.
१३शाळेला संस्थेचा भक्कम आधार वाटावा.
१४शालेय परिवाराच्या सुखदुःखात सहभागी होण्याची मानसिक असावी.
१५संस्थेच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असावी.
१६जास्तीत जास्त वेळ शाळेच्या भल्याकरिताच देण्याचा प्रयत्न व्हावा.
१७शाळा व समाज यांचे संबंध अधिक मजबून करण्याचा प्रयत्न व्हावा.


हे पण पहा :- देशभक्ति गीत

उपमुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये

Duties and Responsibilities of Vice Principal

१] उपमुख्याध्यापकांचे कर्तव्ये (Duties of Vice-Principal) :-


अ क्रउपमुख्याध्यापकांचे कर्तव्ये
उपमुख्याध्यापक पदाकरीता विहित केलेल्या कार्यभाराप्रमाणे इ. ८ वी ते १० वीच्या अध्यापनाचे व दैनंदिन प्रशासकीय काम करील. तसेच शालोय शिक्षणाला पोषक/पुरक कार्यक्रमाबाबत काम करील.
मुख्याध्यापकाने वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार शैक्षणिक प्रशासन व पर्यवेक्षणाचे कामी मुख्याध्यापकास सहाय्य करील.
शाळेतील शिक्षकाच्या संबंधात रोजवही ठेवील. वार्षिक नियोजनानुसार शिक्षकांच्या कामाची नोंद रोजवहीत घेईल. प्रत्येक आठवड्यात पर्यवेक्षकाच्या किंवा शिक्षकांच्या किमान तीन पाठांचे निरीक्षण करील आणि त्याची नोंद प्राप्त निरीक्षण नोंदवही (लॉगबुकमध्ये) ठेवील. त्यांच्या कामात त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करण्याकरीता त्यांना मार्गदर्शन करील अथवा प्रकरणी आवश्यकता भासल्यास अशा शिक्षकास समज देण्याकरिता मुख्याध्यापकास अहवाल सादर करील.
शाळेचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास मुख्याध्यापकास मदत करील.
मुख्याध्यापकाने निदेश दिल्यास शिक्षक सभांचे आयोजन करील व त्यांचा अहवाल सादर करील.
शैक्षणिक व शासकीय कामासंबंधी मुख्याध्यापक सांगेल ती कामे करील आणि यासंबंधी मुख्याध्यापक देईल त्या सूचनांचे पालन करील.
दिशानिदेशन पाठ्यक्रम शिकून घेईल आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करील.


२] उपमुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या (Responsibilities of Vice-Principal) :-


अ क्रउपमुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या
मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीत शाळेच्या सर्व कामकाजाची व्यवस्था पाहील व आवश्यकतेनुसार निर्णय घेईल. त्याचप्रमाणे या कालावधीत अनुसूची ऐ मधील विनिर्दीष्ट केलेल्या मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या उपमुख्याध्यापकांच्या असतील.
मुख्याध्यापकाचे सूचनांचे अधिनतेने शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाचे पर्यवेक्षण त्यांची वर्तणूक, शिस्तपालन, कार्यक्षमता व वर्गातील उपस्थिती याबाबत जबाबदार राहील.
वार्षिक नियोजन, वेळापत्रक, विविध परीक्षा, वार्षिक निकाल इत्यादीबाबत मुख्याध्यापकांस सहाय्य करील.
शाळा दुबार पद्धतीची असल्यास मुख्याध्यापकानी निदेश दिल्यास शाळेच्या एका पाळीच्या कामकाजास जबाबदार राहील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शासकिय परीक्ष परिषद यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यास मुख्याध्यापकास सहाय्य करील.
शाळेचा निकाल व शैक्षणिक दर्जा चांगला राखण्याकरिता मुख्याध्यापकास सहय्य करील.
शाळा तपासणीचेवेळी तपासणी अधिकाऱ्यास शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय बाबीसंबंधीचे आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करण्याकरिता मुख्याध्यापकास सहाय्य करील.

शाळेचा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याची दक्षता घेईल. प्राथमिक सुविधा पिण्याचे स्वच्छ पाणी इ. संबंधात अडचण आल्यास मुख्याध्यापकांचे सूचनेनुसार कार्यवाही करील.
शासनाने आयोजित केलेल्या कोणत्याही परीक्षेसाठी आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांसाठी परीक्षक किंवा सहाय्यक परीक्षक किंवा नियामक किंवा प्रमुख नियामक किंवा प्राश्निक (पेपर सेंटर) किंवा विषयतज्ज्ञ किंवा परीक्षा संचालक म्हणून काम करील आणि शासनाकडून आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा विभागीय मंडळ यांच्याकडून सोपविण्यात येतील असे अन्य काम करील आणि याबाबत शासनाने किंवा मंडळाने त्यासंदर्भात विहित केलेल्या नियमानुसार कार्यक्षमता आणि शिस्तपालन यासाठी जबाबदार राहील.



            तुम्हाला उपमुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Vice Principal ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad