१० ऑक्टोबर दिनविशेष | 10 October Dinvishesh | 10 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 9, 2023

१० ऑक्टोबर दिनविशेष | 10 October Dinvishesh | 10 October day special in Marathi

१० ऑक्टोबर दिनविशेष

10 October Dinvishesh

10 October day special in Marathi

१० ऑक्टोबर दिनविशेष | 10 October Dinvishesh | 10 October day special in Marathi

            १० ऑक्टोबर दिनविशेष ( 10 October Dinvishesh | 10 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० ऑक्टोबर दिनविशेष ( 10 October Dinvishesh | 10 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० ऑक्टोबर दिनविशेष

10 October Dinvishesh

10 October day special in Marathi


जागतिक मानसिक आरोग्य दिन [WHO] [World Mental Health Day (WHO)] 

[१७३१]=> हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञहेन्री कॅव्हेंडिश यांचा जन्म.

[१८३०]=> स्पेनची राणी इसाबेला (दुसरी) यांचा जन्म.

[१८४४]=> रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.

[१८४६]=> इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.

[१८७१]=> निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म.

[१८७७]=> मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा जन्म.

[१८९८]=> अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन.

[१८९९]=> भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म.

[१९०२]=> कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म.

[१९०६]=> इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म.

[१९०९]=> क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म.

[१९१०]=> हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.

[१९११]=> चीनमध्ये किंग वंशाचा शेवट.

[१९११]=> जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.

[१९१२]=> भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म.


[१९१३]=> पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.

[१९१६]=> सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.

[१९४२]=> सोव्हिएत युनियनचे ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना छळ छावणीत ठार केले.

[१९५४]=> चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.

[१९५४]=> श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.

[१९६०]=> विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

[१९६४]=> जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

[१९६४]=> प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन.

[१९७०]=> फिजीला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

[१९७५]=> पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश केला.

[१९८३]=> मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन.

[१९९८]=> आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.

[२०००]=> श्रीलंकेच्या ६व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे निधन. त्यांनीच सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले.

[२००५]=> युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांचे निधन.

[२००६]=> शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन.

[२००८]=> कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन.

[२०११]=> गझल गायक जगजित सिंग यांचे निधन.


            तुम्हाला १० ऑक्टोबर दिनविशेष | 10 October Dinvishesh | 10 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad