१६ ऑक्टोबर दिनविशेष | 16 October Dinvishesh | 16 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 15, 2023

१६ ऑक्टोबर दिनविशेष | 16 October Dinvishesh | 16 October day special in Marathi

१६ ऑक्टोबर दिनविशेष

16 October Dinvishesh

16 October day special in Marathi

१६ ऑक्टोबर दिनविशेष | 16 October Dinvishesh | 16 October day special in Marathi

            १६ ऑक्टोबर दिनविशेष ( 16 October Dinvishesh | 16 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ ऑक्टोबर दिनविशेष ( 16 October Dinvishesh | 16 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ ऑक्टोबर दिनविशेष

16 October Dinvishesh

16 October day special in Marathi


जागतिक अन्न दिन [FAO] [World Food Day (FAO)]

[१६७०]=> शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा जन्म.

[१७७५]=> ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

[१७९३]=> फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

[१७९३]=> फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचे निधन.

[१७९९]=> भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन.

[१८४१]=> जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

[१८४४]=> अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म.

[१८४६]=> डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

[१८५४]=> आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म.

[१८६८]=> डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

[१८८६]=> इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन यांचा जन्म.

[१८९०]=> वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा जन्म.


[१८९६]=> स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्म.

[१९०५]=> आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन.

[१९०५]=> भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

[१९०७]=> कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म.

[१९२३]=> वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी द वॉल्ट डिस्‍ने कंपनी ची स्थापना केली.

[१९२६]=> केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक चार्ल्स डोलन यांचा जन्म.

[१९४४]=> उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

[१९४८]=> अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक हेमा मालिनी यांचा जन्म.

[१९४८]=> नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचे निधन.

[१९४९]=> भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार क्रेझी मोहन यांचा जन्म.

[१९५०]=> अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.

[१९५१]=> पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या.

[१९५१]=> पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.


[१९५९]=> मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांचा जन्म.

[१९६८]=> हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

[१९७३]=> हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

[१९७५]=> बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.

[१९७८]=> माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.

[१९८१]=> इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचे निधन.

[१९८२]=> भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म.

[१९८४]=> आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

[१९८६]=> ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शिखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.

[१९९७]=> मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

[१९९९]=> जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

[२००२]=> लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचे निधन.

[२००३]=> नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

[२०१३]=> भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन.

Read Also :- Vehicles Names

            तुम्हाला १६ ऑक्टोबर दिनविशेष | 16 October Dinvishesh | 16 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad