२ ऑक्टोबर दिनविशेष | 2 October Dinvishesh | 2 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 1, 2023

२ ऑक्टोबर दिनविशेष | 2 October Dinvishesh | 2 October day special in Marathi

२ ऑक्टोबर दिनविशेष

2 October Dinvishesh

2 October day special in Marathi

२ ऑक्टोबर दिनविशेष | 2 October Dinvishesh | 2 October day special in Marathi

            २ ऑक्टोबर दिनविशेष ( 2 October Dinvishesh | 2 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ ऑक्टोबर दिनविशेष ( 2 October Dinvishesh | 2 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ ऑक्टोबर दिनविशेष

2 October Dinvishesh

2 October day special in Marathi


आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन [International Day of Non-Violence]

महात्मा गांधी जयंती [Mahatma Gandhi BIrth Anniversary]

लाल बहादूर जयंती [Lal Bahadur Shasri Birth Anniversary]

[ई.पू. ९७१]=> गझनीचा महमूद यांचा जन्म.

[१८४७]=> जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म.

[१८६९]=> मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

[१८९१]=> पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म.

[१९०४]=> भारतरत्न लालबहादूर शास्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म.

[१९०६]=> चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन.

[१९०८]=> विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म.

[१९०९]=> रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

[१९२५]=> जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

[१९२७]=> शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म.

[१९२७]=> स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन.

[१९३९]=> भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म.


[१९४२]=> चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.

[१९४८]=> अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म.

[१९५५]=> पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.

[१९५८]=> गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९६७]=> थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

[१९६८]=> झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.

[१९६९]=> महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

[१९७१]=> संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म.

[१९७५]=> स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन.

[१९८५]=> अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन.

[२००६]=> निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

Read Also :- Our Helpers

            तुम्हाला २ ऑक्टोबर दिनविशेष | 2 October Dinvishesh | 2 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad