२० ऑक्टोबर दिनविशेष | 20 October Dinvishesh | 20 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 19, 2023

२० ऑक्टोबर दिनविशेष | 20 October Dinvishesh | 20 October day special in Marathi

२० ऑक्टोबर दिनविशेष

20 October Dinvishesh

20 October day special in Marathi

२० ऑक्टोबर दिनविशेष | 20 October Dinvishesh | 20 October day special in Marathi

            २० ऑक्टोबर दिनविशेष ( 20 October Dinvishesh | 20 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० ऑक्टोबर दिनविशेष ( 20 October Dinvishesh | 20 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० ऑक्टोबर दिनविशेष

20 October Dinvishesh

20 October day special in Marathi


जागतिक सांख्यिकी दिन [World Statistics Day]

राष्ट्रीय एकता दिवस [National Solidarity Day]

[१८५५]=> गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म.

[१८९०]=> ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन.

[१८९१]=> अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म.

[१८९३]=> केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म.

[१९०४]=> चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.

[१९१६]=> लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म.

[१९२०]=> भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म.

[१९२७]=> भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म.

[१९४७]=> अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

[१९५०]=> कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.

[१९५२]=> केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

[१९६१]=> मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन.

[१९६२]=> चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.

[१९६३]=> क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.

[१९६४]=> अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन.

[१९६९]=> डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.

[१९७०]=> हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.


[१९७१]=> मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

[१९७३]=> सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

[१९७४]=> प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन.

[१९७८]=> भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.

[१९८४]=> नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन.

[१९९१]=> उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

[१९९५]=> ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.

[१९९६]=> पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचे निधन.

[१९९९]=> समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.

[२००१]=> रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.

[२००९]=> गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन.

[२०१०]=> क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन.

[२०११]=> लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

[२०११]=> लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन.

[२०१२]=> पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन.

Read Also :- Wild Animals Name

            तुम्हाला २० ऑक्टोबर दिनविशेष | 20 October Dinvishesh | 20 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad