६ ऑक्टोबर दिनविशेष | 6 October Dinvishesh | 6 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 5, 2023

६ ऑक्टोबर दिनविशेष | 6 October Dinvishesh | 6 October day special in Marathi

६ ऑक्टोबर दिनविशेष

6 October Dinvishesh

6 October day special in Marathi

६ ऑक्टोबर दिनविशेष | 6 October Dinvishesh | 6 October day special in Marathi

            ६ ऑक्टोबर दिनविशेष ( 6 October Dinvishesh | 6 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ ऑक्टोबर दिनविशेष ( 6 October Dinvishesh | 6 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ ऑक्टोबर दिनविशेष

6 October Dinvishesh

6 October day special in Marathi


@ जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस [World Cerebral Palsy Day]

[१६६१]=> शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन.

[१७७९]=> स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचा जन्म.

[१८६६]=> रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म.

[१८९२]=> इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन.

[१८९३]=> खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म.

[१९०८]=> ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.

[१९१२]=> अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म.

[१९१३]=> कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म.

[१९१४]=> नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म.

[१९२७]=> वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

[१९३०]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक रिची बेनो यांचा जन्म.

[१९४३]=> संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचा जन्म.


[१९४६]=> अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार विनोद खन्ना यांचा जन्म.

[१९४६]=> इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचा जन्म.

[१९४९]=> पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

[१९५१]=> केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचे निधन.

[१९६३]=> पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

[१९७२]=> संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म.

[१९७३]=> इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.

[१९७४]=> भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन.

[१९७९]=> इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन.

[१९८१]=> इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.

[१९८१]=> इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचे निधन.

[१९८७]=> फिजी प्रजासताक बनले.

[२००७]=> जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

[२००७]=> महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन.

[२००७]=> लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन.

[२०१५]=> हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन.


            तुम्हाला ६ ऑक्टोबर दिनविशेष | 6 October Dinvishesh | 6 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad