७ ऑक्टोबर दिनविशेष | 7 October Dinvishesh | 7 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 6, 2023

७ ऑक्टोबर दिनविशेष | 7 October Dinvishesh | 7 October day special in Marathi

७ ऑक्टोबर दिनविशेष

7 October Dinvishesh

7 October day special in Marathi

७ ऑक्टोबर दिनविशेष | 7 October Dinvishesh | 7 October day special in Marathi

            ७ ऑक्टोबर दिनविशेष ( 7 October Dinvishesh | 7 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ ऑक्टोबर दिनविशेष ( 7 October Dinvishesh | 7 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ ऑक्टोबर दिनविशेष

7 October Dinvishesh

7 October day special in Marathi


जागतिक अधिवास दिन [World Habitat Day]

जागतिक कापूस दिवस [World Cotton Day]

[ई.पू. ३७६१]=> हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

[१७०८]=> शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन.

[१८४९]=> अमेरिकन गूढ व भयकथांचा लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचे निधन.

[१८६६]=> मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म.

[१८८५]=> अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म.

[१९००]=> जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर यांचा जन्म.

[१९०५]=> पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

[१९०७]=> गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म.

[१९१२]=> हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

[१९१४]=> गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म.

[१९१७]=> कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म.

[१९१९]=> के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.

[१९१९]=> महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.

[१९२९]=> आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.


[१९३३]=> पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.

[१९४९]=> जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.

[१९५१]=> फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन.

[१९५२]=> रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जन्म.

[१९५९]=> एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म.

[१९६०]=> शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.

[१९७१]=> ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९७५]=> कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन.

[१९७८]=> भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.

[१९९६]=> फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.

[१९९८]=> महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.

[१९९९]=> साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन.

[२००१]=> सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

[२००२]=> सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.

[२०११]=> अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचे निधन.

Read Also :- Grains Names

            तुम्हाला ७ ऑक्टोबर दिनविशेष | 7 October Dinvishesh | 7 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad