८ ऑक्टोबर दिनविशेष | 8 October Dinvishesh | 8 October day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 7, 2023

८ ऑक्टोबर दिनविशेष | 8 October Dinvishesh | 8 October day special in Marathi

८ ऑक्टोबर दिनविशेष

8 October Dinvishesh

8 October day special in Marathi

८ ऑक्टोबर दिनविशेष | 8 October Dinvishesh | 8 October day special in Marathi

            ८ ऑक्टोबर दिनविशेष ( 8 October Dinvishesh | 8 October day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ ऑक्टोबर दिनविशेष ( 8 October Dinvishesh | 8 October day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ ऑक्टोबर दिनविशेष

8 October Dinvishesh

8 October day special in Marathi


@ भारतीय वायुसेना दिन [Indian Air Force Day]

[१३१७]=> जपानचे सम्राट फुशिमी यांचे निधन.

[१८५०]=> फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म.

[१८८८]=> कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन.

[१८८९]=> डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म.

[१८९१]=> उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म.

[१९२२]=> संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म.

[१९२४]=> भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म.

[१९२६]=> जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म.

[१९२८]=> ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.

[१९३०]=> भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म.

[१९३२]=> इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

[१९३५]=> द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.

[१९३६]=> हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन.

[१९३९]=> दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

[१९५९]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.

[१९६०]=> नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.

[१९६२]=> अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.


[१९६२]=> नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

[१९६७]=> इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचे निधन.

[१९७२]=> वन्यजीव सप्ताह

[१९७८]=> ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.

[१९७९]=> स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन.

[१९८२]=> पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

[१९९३]=> पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.

[१९९६]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन.

[१९९७]=> अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.

[१९९८]=> देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.

[२००१]=> सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

[२००५]=> काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.

[२०१२]=> केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन.

[२०१२]=> पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.

Read Also :- Tastes Names

            तुम्हाला ८ ऑक्टोबर दिनविशेष | 8 October Dinvishesh | 8 October day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad