मुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Principal - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 14, 2024

मुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Principal

मुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या

Duties and Responsibilities of Principal

मुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Duties and Responsibilities of Principal

मुख्याध्यापक कार्यभार  ( Principal Workload ):-

२० पेक्षा कमी वर्ग असतील तर आठवड्याला ६ तास शिकविण्याचा कार्यभार असतो.
२० पेक्षा जास्त वर्ग असतील तर आठवड्याला ४ तास शिकविण्याचा कार्यभार असतो.

उपमुख्याध्यापक कार्यभार ( Vice-Principal Workload ) :-

आठवड्याला ८ तास शिकविण्याचा कार्यभार असतो.


पर्यवेक्षक कार्यभार (Supervisor Workload) :-

२० पेक्षा कमी वर्ग असतील तर आठवड्याला १२ तास शिकविण्याचा कार्यभार असतो.
(म्हणजेच येथे पर्यवेक्षकाचे एकच पद आहे).
२० पेक्षा जास्त वर्ग असतील तर आठवड्याला १० तास शिकविण्याचा कार्यभार असतो.
(म्हणजे १ पेक्षा जास्त पर्यवेक्षकाची पदे असतील त्या ठिकाणी).

शिक्षक कार्यभार (Teacher Workload) :-

१] पटावरील सरासरी विद्यार्थी संख्या ५० पेक्षा जास्त असेल, तर आठवड्याला १७ तास शिकविण्याचा कार्यभार असतो.
२] पटावरील सरासरी विद्यार्थी संख्या ३१ ते ५० असेल तर आठवड्याला १८ शिकविण्याचा कार्यभार असतो.
३] पटावरील विद्यार्थी संख्या ३० किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आठवड्याला १९ शिकविण्याचा कार्यभार असतो.

शिक्षकेतर कर्मचारी कार्यभार (Non-Teaching Staff Workload) :-

शाळेच्या शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाचे कामाचे व उपस्थितीचे तास हे त्यांच्यापैकी लिपिकवर्गीय कर्मचारी वर्ग, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादिंच्या बाबतीत प्रत्येक आठवड्या ३८.५ तास (भोजन सुटी धरून) आणि चपराशी, हमाल इत्यादीसारख्या निम्न श्रेणी कर्मचाीवर्गाच्या बाबतीत प्रत्येक आठवड्याला ५० तास (भोजन सुटी धरून) असतील.

पूर्णकालीक शिक्षकाच्या शाळेच्या कामाच्या तासामध्ये शाळेच्या गरजेनुसार रोजची विश्रांतीची वेळ वगळता, आठवड्यातून ३० तासापर्यंत शाळेच्या आवारात हजर रहावे लागेल.


मुख्याध्यापकाची कर्तव्ये


अ] शैक्षणिक बाबीविषयक कर्तव्ये

अ क्रशैक्षणिक बाबीविषयक कर्तव्ये
मुख्याधयापक पदाकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यभारानुसार इयत्ता ९वी, १०वीच्या अध्यापन करील व त्या विषयाचे पेपर तपासील.
शाळेतील शिक्षकांच्या अध्यपनाच्या कामावर पर्यवेक्षण करील.
शाळेतील अध्यापनाचे व सहशालेय कार्यक्रमाचे नियोजन करील व त्याचे वार्षिक नियोजन करून शिक्षकांमध्ये समान वाटप करील. विषयाच्या अध्यापनाचे नियोजन करताना अनिवार्य विषय व वैकल्पिक विषय यांचे वाटप सर्व शिक्षकांमध्ये समानरित्या करील.
शाळेचे वर्गवार वेळापत्रक, मंडळाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार विहित केलेल्या विषयनिहाय तासिकेनुसार तयार करील.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शिक्षणासाठी तो जबाबदार राहील.
शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून व ती टिकवून ठेवण्यास जबाबदार राहील.
सर्व वर्गाच्या सर्व परीक्षा/चाचण्यांचे नियोजन करील व त्यांचे आयोजन वेळेवर करील.

प्रत्येक विषयाचे घटक नियोजन शिक्षकाकडून वेळेवर केले जाईल आणि घटक नियोजनानुसार अध्यापनाचे कामकाज चालेल हे पाहिल.
प्रत्येक शिक्षकाने तासिकानिहाय आवश्यक ते टाचण काढले आहे याची खात्री करील.
१०आठवड्यातून शिक्षकांच्या व पर्यवेक्षकांच्या किमान तीन तासिकांचे निरीक्षण करील व लॉगबुकमध्ये नोंद ठेवील तसेच विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला गृहपाठ, स्वाध्याय व प्रात्यक्षिके कामाच्या वह्या यांची तपासणी शिक्षकांकडून वेळच्यावेळी होईल असे पाहिल.
११शासनाने विहित केलेली पाठ्यपुस्तके व अन्य साहित्याव्यतिरिक्त अन्य पुस्तके व साहित्य शाळेत वापरले जाणार नाही याची खात्री करील.
१२विद्यार्थ्याच्या वैयक्तिक वापरासाठी शालेय साहित्याची (गणवेश, लेखन साहित्य इत्यादीसह) खरेदी शाळेकडून केली जाणार नाही किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकाशनाची किंवा कंपनीची शिपारस केली जाणार नाही. किंवा विशिष्ट प्रकाशनाचे किंवा कंपनीचत्या साहित्याची खरेदी किंवा विशिष्ट दुकानातून करावी अशा सूचना दिल्या जाणार नाहीत हे पाहील व त्यास जबाबदार राहील. तथापि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताच्या दृष्टीने अपवादात्मक परिस्थितीत शालेय उपयुक्त अशा साहित्याची खरेदी शिक्षक पालक संघाच्या मान्यतेने करील.
१३शासनाने विहित केलेल्या निकषानुसारच विद्यार्थ्याची वगोन्नती दिली जाईल असे पाहील त्याचप्रमाणे वर्गोन्नती देताना कोणत्याही शिक्षकाकडून गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेईल व त्यास जबाबदार राहील.
१४शासनाने विहित केलेल्या प्रशिक्षीत विषयक कार्यक्रमासाठी तसेच अन्य कार्यक्रमासाठी/बैठकांच्या आवश्यकतेनुसार स्वतःच उपस्थित राहील अथवा अन्य शिक्षकांना किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना पाठविल.
१५स्वतःचे विषय ज्ञान व अध्यापनाबाबतचे ज्ञान अद्ययावत ठेवील व अन्य शिक्षकांना विषय व अध्यापन ज्ञान अद्यवायत ठेवण्याच्या सूचना करील.
१६विद्यार्थ्यांचा शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी वेळोवेळी शिक्षक, पालक यांच्या बैठका घेऊन आवश्यक उपक्रम राबवील व शिक्षकांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्या उपलब्ध करून देऊन उत्कृष्ट अध्यापनासाठी प्रवृत्त करील.
१७विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षक सहकाऱ्यांशी व व्यवस्थापनाशी विचार विनिमय करील व योग्य ते उपक्रम कार्यान्वित करील, तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना धर्मनिरपेक्षता सामाजिक बांधिलकी व निर्भयता, आत्मसन्मान आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करील.
१८माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल उंचावण्यास पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून दक्षता घेईल.
१९शाळेतील शैक्षणिक वातावरण निकोप, सुदृढ व आनंददायी राहील अशी सातत्याने कार्यवाही करील.
२०निबंधलेखन, पत्रलेखन, व्याकरण आणि प्रयोग (प्रात्यक्षिक) अभ्यासक्रमानुसार घेतले जातील असे पाहील.
२१विहित मुदतीत घटक चाचण्या व सत्र परीक्षांचे निकाल जाहीर करील व त्यास जबाबदार राहील.


आ] प्रशासकीय व आर्थिक बाबीविषयक कर्तव्ये


अ क्रप्रशासकीय व आर्थिक बाबीविषयक कर्तव्ये
स्वतः शाळामध्ये नियमितपणे व वेळेवर उपस्थित राहील व त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी नियमितपणे व वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता घेईल.
शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आपल्या सहाय्यकांच्या मदतीने संपर्क ठेवील त्या विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचा आढावा घेईल, अनियमित उपस्थितीच्या कारणांची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्याची व्यवस्था पालकांनी करावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करील व आपल्या शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करील.
विद्यार्थ्याने किंवा पालकाने अर्ज केल्यावर व सर्व बाबींची पूर्तता केल्यावर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा सर्वसाधारण नोंदवहीतील उतारे आठ दिवसांच्या आत देईल. माध्यमिक शाळा संहितेमध्ये विहित केलेली किंवा शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नोंदवह्या व अभिलेख या प्रकाणे अद्ययावत ठेवून जतन करण्याची व्यवस्था करील.
शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध कला स्पर्धा किंवा अन्य स्पर्धा सहशालेय कार्यक्रम आवश्यकतेनुसार आयोजित करील.
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची व निटनेटकेपणाची सवय लावील व त्यांची वर्तणूक चांगली राहील व ते शाळांची शिस्त पाळतील असे पाहील.
शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवील, त्याचं कामात समन्वय साधील, त्यांची कार्यक्षमता व शिस्त यांविषयी उत्तरदायी राहील. व अशी आपल्या सहाय्यकांनी गैरवर्तणूक किंवा शिस्तभंग केल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई होईल असे पाहील.
आपल्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाची रोजवहित नोंद घेईल.

आपल्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करील.
शाळा समिती, विद्या परिषद आणि पालक शिक्षक संध यांच्या बैठका बोलाविण्याची व्यवस्था करील.
१०शाळेच्या मालमत्तेची योग्यरित्या काळजी घेतली जात आहे. आणि शाळेची वास्तू व परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवला जाईल यांची दक्षता घेईल. अशा शाळेच्या मालमत्तेला पोहचलेल्या नुकसानीची माहिती तो योग्य त्या प्राधिकाऱ्याकडे व्यवस्थापनाकडे तात्काळ कळविल.
११आपल्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके दोन प्रतीत ठेवील व त्यातील नोंदी अद्ययावत करून घेईल आणि त्या साक्षांकित करील तसेच भविष्यनिर्वाह निधीलेखे अद्ययावत नोंदीसह ठेवील.
१२विहित निकषांनुसार आपल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची जेष्ठता सूची तयार करण्यास आणि ती दरवर्षी अद्ययावत करून जतन करून ठेवण्यास व्यवस्थापक वर्गास सहाय्य करील.
१३कर्मचऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेवर प्रतिवेदीत व पुर्विलोकीत होतील. याची दक्षता घेईल आणि त्यावर पुढील कार्यवाही करील.
१४कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे वेळेवर तयार करील आणि संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे ती वेळेवर सादर होतील असे पाहील.
१५नियमानुसार व विहित निकषानुसार आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग शाळांमध्ये असल्याचे किंवा नसल्याचे शाळा समितीच्या नजरेस आणून देईल आणि काही कमतरता असल्यास शक्य तितक्या लवकर ती दूर करण्याचा प्रयत्न करील.
१६विहित निकषानुसार व कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देईल व त्यास जबाबदार राहील.
१७शाळेचा पत्रव्यवहार सर्व संबंधितांशी करील.
१८शाळेच्या प्रशासकीय, आर्थिक व दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षीय नियंत्रण सनियंत्रण ठेवील.
१९कर्मचाऱ्यांची वेतन देयके व अन्य देयके विहित वेळापत्रकानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर होतील हे पाहील व त्यास जबाबदार राहील.
२०जडस्तू संग्रह नोंदवहीनुसार शाळेतील वस्तू, स्थायी व अस्थायी मालमत्ता यांची पडताळणी करील.
२१शाळेचे कामकाज व्यवस्थितरित्या चालावे यासाठी आवश्यकतेनुसार उपसमित्या स्थापन करून त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सोपवावी आणि त्यावर नियंत्रण ठेवावे.
२२शासनाने विहित व मान्य केल्याप्रमाणे शैक्षणिक व अन्य शुल्क विद्यार्थ्यांकडून वेळीच वसूल होईल असे पाहील. शुल्कापोटी जमा होणारी रक्कम वेळीच संबंधित खात्यात जमा होईल याची दक्षता घेईल व त्यास जबाबदार राहील.
२३शाळा व्यवस्थापनाच्या मान्यतेने शालेय साहित्य खरेदीसाठी समिती स्थापन करण्याची कार्यवाही करील.
२४शाळेचे कॅशबुक, लेजर, पेटीकॅशबुकमधील नोंदी तपासून साक्षांकित करील व खर्चाचे व्हाऊचर्स सुरक्षित ठेवले जातील याची व्यवस्था करील. महिन्यातून किमन एकदा अजानक कॅशबुकची प्रत्यक्ष तपासणी करून तशी नोंद ठेवील.
२५कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा व इतर भत्ते यांचा हिशोब ठेवील. कर्मचाऱ्यांना योग्यवेळी वार्षिक वेतनवाढी देईल व त्यांच्या नोंदी सेवापुस्तकात करून त्या साक्षांकित करील.
२६वेतन निश्चितीची प्रकरणे वेळच्यावेळी विहित मुदतीत पूर्ण करून सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करील.
२७प्रत्येक वर्षाच्या लेखांचे लेखापरीक्षण अधिकृत सनदी लेखा परिक्षकांकडून करून घेईल.
२८शासनाने विहित केलेल्या शैक्षणिक शुल्काशिवाय किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांने मंजूर केलेल्या शैक्षणिक व अन्य शुक्लाशिवाय कोणतेही नियमबाह्य शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार नाही, याची दक्षता घेईल व त्यास जबाबदार राहील.
२९विहित कालावधीसाठी शाळेत उपस्थित राहील.
३०सबळ कारणाशिवाय शाळेचे मुख्यालय सोडणार नाही. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने मुख्यालय सोडील व हालचाल नोंदीवहीमध्ये नोंदी ठेवील.
३१पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यास आणि नियमित सभा आयोजित करून सभेचे इतिवृत्त ठेवून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास जबाबदार राहील.


मुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या


अ क्रमुख्याध्यापकाच्या जबाबदाऱ्या
सर्व शासकीय योजनांची विहित निकषानुसार अंमलबजावणी करील.
शासनाने या नियमावलीमध्ये केलेल्या सर्व तरतुदी आणि माध्यमिक शाळा संहितेमधील सर्व तरतुदी यांचे पालन करील.
शासकीय अनुदानाचे विहित निकषानुसार योग्य प्रकारे विनियोग करील व हिशोब ठेवील.
शासनाने किंवा अन्य संस्थांनी प्रदान केलेल्या सर्व शिष्यवृत्त्या व शैक्षणिक सवलतीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्याचे विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या आत वाटप करील व त्यांचा हिशोब व विनियोग प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्यास एक महिन्याच आत सादर करील.
राष्ट्रीय व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या मोहिमेच्या/कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी, मागणी झाल्यास त्याबाबतची शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे संबंधित प्राधिकाऱ्यास विहित मुदतीत कळविल.
शासनाकडून, निमशासकीय संस्थाकडून किंवा दानशूर व्यक्तीकडून किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून शाळेस पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या देणगीचा हिशोब ठेवून त्याचा विहित निकषानुसार विनियोग करील.
शासनाने स्थापन केलेल्या संस्था, मंडळे यामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व त्यांच्या घटक संस्था, राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व अन्य शासकीय संस्था व विभागाकडून आयोजित होणाऱ्या परीक्षांसाठी विहित केलेले परीक्ष शुल्क विद्यार्थ्याकडून वेळेवर गोळा करील आणि ते संबंधित मंडळे/संस्थेकडे विहित कालावधीपूर्वी काळजीपूर्वक जमा करील.

माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षा व अन्य शासकीय परीक्षा किंवा शासनाकडून शिफारस केलेल्या संस्थाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे आयोजनाबाबत परीक्षापूर्व/परीक्षोत्तर कामाबाबतची गोपनीयता राखील व त्यबाबतचे सोपविलेले काम करील.
विभागाच्या व शासनाच्या परीक्षांच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग) आयोजनासाठी शाळेची वास्तू व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देईल व त्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यास आवश्यक ते सर्व सहय्य करील.
१०राज्य शासन, शिक्षण विभागाचे संचालक किंवा शिक्षण विभागाचे अन्य अधिकारी, शिक्षणासंबंधाने सोपवील अशी अन्य कामे करील व आदेशानुसार कारवाई करून त्यासंबंधी दिलेल्या सूचनांचे पालन करील. तसेच सहकाऱ्यांकडून कामे करून घेईल.
११शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकऱ्यांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी मागविलेली सांख्यिकी माहिती व अन्य माहिती विहित मुदतीत/विहित नुमन्यात संबंधितांकडे पाठवील.
१२प्रतिवर्षी शाळेच्या वार्षिक लेखांचे लेखा तक्ते सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करील.
१३शाळेचा निकाल व शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट ठेवण्याची दक्षता घेईल.
१४शासकीय आधिकाऱ्याने आदेशीत केलेल्या सर्व प्रकारची वसूली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून करील, त्यांचा हिशोब ठेवील, तसेच सदर रक्कम शासन कोषागारात आदेशीत केल्याप्रमाणे भरील.
१५पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात, वर्तणूकीसंदर्भात विचारलेली माहिती पालकांना देईल, त्यांच्या शंकांचे निरसन करून तक्रारीचे निवारण करील.
१६समाजोपयोगी कामे करणाऱ्या संस्थांना शाळेचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आवश्यक सहकार्य करील.
१७शासकीय अधिकारी आणि व्यवस्थापन वर्ग यांनी शाळेला भेटी देवून केलेल्या सूचनांचे व आदेशांचे पालन करील व तसा अनुपालन अहवाल सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करील.
१८शाळा तपासणी अधिकाऱ्यानी आपल्या तपासणी अहवालामध्ये केलेल्या सूचनांची व त्रुटींची पूर्तता करील व तसा अनुपालन अहवाल सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करील.
१९तपासणी अधिकारी किंवा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी भेटीच्या वेळेस किंवा तपासणीच्या वेळेस शाळेच्या संबंधातील ज्या अभिलेखांची व कागदपत्रांची मागणी केली असेल त्यानुसार ती उपलब्ध करून देईल.
२०ज्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांबाबत विशिष्ट उपाययोजना करील.
२१व्यवस्थापनाशी वेळेवेळी संपर्क साधून किंवा नियमित बैठकी आयोजित करून शाळेच्या प्रगतीबाबतं व्यवस्थापनाला अवगत करील, प्रगतीसाठी उपाययोजना सुचवील, माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदी विचारात घेऊन व्यवस्थापनाने सूचित केलेली/आदेशित केलेली काम पूर्ण करील.
२२मुलां-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुपारच्या सुट्टीत मुलांना भोजन करण्यासाठी किमान व्यवस्था, शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याची व्यवस्था, प्रकाशाची व्यवस्था, धुम्रपान करण्यास बंदी, याबाबत व्यवस्थापानाशी संपर्क साधून आवश्यक ती व्यवस्था निर्माण करण्याचर प्रयत्न करील.
२३विविध परीक्षा, वक्तृत्व, क्रीडा, इत्यादी स्पर्धाकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करील.
२४शैक्षणिक सहली व अन्य शालेय कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी बाहेरगांवी असताना ज्या शिक्षकांकडे त्यांची जबाबदारी सोपविली आहे ते शिक्षक शिस्तीने व जबाबदारीने वागतील याची दक्षता घेईल. तसेच विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची दक्षता घेईल.
२५विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची व इतर सवलतीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना वेळीच मिळेल असे पाहील. अशी रक्कम कोणत्याही कारणांमुळे विद्यार्थ्यांना सुपूर्द करणे शक्य झाले नाही तर ती शासकीय कोषागारात भरणा करील व त्याची सकारण योग्य त्या नोंदवहीत नोंद ठेवील.
२६शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेवर लिहिण्याची दक्षता घेईल.
२७फिद्वारे जमा होणारी दैनंदिन रक्कम त्याच दिवशी बँकेत भरणा करील. फी परतावा रक्कम व अनामत रक्कम नियमानुसार विहित मुदतीत विद्यार्थ्यांना परत करील.
२८मंडळाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार वर्गनिहाय व विषयनिहाय उपलब्ध होणाऱ्या तासिकेनुसारच विहित अर्हताधारक शिक्षक नेमण्याबाबत व्यवस्थापनास सूचित करील व त्यानुसारच नेमणुका होतील असे पाहील.
२९विषयनिहाय व वर्गनिहाय विहित तासिकानुसार कार्यभार निश्चित करून सक्षम प्राधिकाऱ्याकडे संच मान्यतेचा प्रस्ताव वेळेत सादर करील.
३०नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक जातीच्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी सक्षम अधिकारी/प्राधिकारी यांना गोपनीय पत्र पाठवून नेमणुकीपासून तीन महिन्याच्या आत पूर्ण करील व त्यास जबाबदार राहील.
३१सक्षम अधिकारी/प्राधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्यांचा नेमणुकीपासून १५ दिवसांत मान्यतेसाठीचा प्रस्ताव संपूर्ण कागपत्रांसह सादर करील.
३२सक्षम अधिकारी/प्राधिकाऱ्यांकडून मान्य अथवा अमान्य झालेल्या प्रस्तावाची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांस पक्ष मिळाल्याच्या दिवशीच देऊन स्वाक्षरी घेईल.
३३नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कर्मचारी संख्येपेक्षा जास्त कर्मचारी आपल्या आस्थापनेवर राहणार नाही याची दक्षता घेईल.
३४शिक्षणाधिकाऱ्याचे त्यांच्या आदेशान्वये पाठविलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्याला शाळेत तात्काळ रूजू करून घेण्यास जबाबदार राहील.
३५शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेईल.
३६शाळेतील प्रतवारी ठेवील व ती वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करील.
३७सहशिक्षक/मुख्य लिपिक/वरिष्ठ लिपिक/कनिष्ठ लिपिक यांचेवर रोख रकमेच्या परिक्षणाची परिरक्षक म्हणून जबाबदारी सोपवील व तथापि रोख रकमेच्या परिरक्षणाची अंतिमतः जबाबदारी मुख्याध्यापकाची असेल.



मुख्याध्यापकांचे अधिकार


अ क्रमुख्याध्यापकांचे अधिकार
शाळा मान्यतेसाठी पत्रव्यवहार करणे.
विद्यार्थ्याचे नाव दाखल करणे, पटावरून कमी करणे.
परीक्षा, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके याविषयी नियोजन करणे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करणे.
नियमानुसार फी आकारणे, फी माफ करणे.
शालेय सत्र, सुट्या, शाळेचे तास ठरविणे.
शिस्त आणि रजा नियम तयार करणे.

अभिलेख, नोंदवह्या आणि निरीक्षण करणे.
वेतन आणि वेतनेतर अनुदान याबाबत निर्णय घेणे.
१०इमारत अनुदान, इतर अनुदान कार्यवाही करणे.


मुख्याध्यापकांची शैक्षणिक बाबींशी संबंधित कर्तव्ये


अ क्रमुख्याध्यापकांची शैक्षणिक बाबींशी संबंधित कर्तव्ये
मुख्याध्यापकाने स्वतः आदर्श शिक्षकांची सर्व कर्तव्ये कटाक्षाने पार पाडून शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योग्य व परिणामकारक अध्यापन होणे, तसेच त्यांच्या शारीरिक शिक्षणाबाबत देखील सर्वसाधारणपणे मुख्याध्यापक जबाबदार राहील.
मुख्याध्यापकांनी शाळेत नियमित उपस्थित राहून शाळेच्या कामकाजाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शाळेच्या वेळात त्यांनी कोणतेही खासगी काम करण्यास प्राधान्य देणे अयोग्य आहे.
कामकाजाच्या तासिका व उपस्थिती : ज्या शाळेत २० तुकड्यांपेक्षा कमी तुकड्या असतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकाने अनुक्रमे ४,८ व १० तास अध्यापनाचे कार्य प्रति आठवडा केले पाहिजे.
ज्या शाळेत २० तुकड्यापेक्षा कमी तुकड्या असतील त्या शाळेतील मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी कमीत कमी ६ ते १२ तास अध्यापन कार्य करणे आवश्यक आहे.
अध्यापन कार्याच्या व्यतिरिक्त वेळात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी शिक्षकांच्या दैनिक पाठटांचणाची तपासणी करून त्यावर स्वाक्षरी करणे. शिक्षकांच्या वर्गात जावून त्यांच्या अध्यापन कार्याचे निरीक्षण करणे व त्यांच्या अध्यापन कार्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आढळतील त्यांची लॉग बुकमध्ये नोंद करून ते लॉग बुक संबंधित शिक्षकास दाखवून त्यावर त्याची स्वाक्षरी घेणे.
प्रत्येक आठवड्यात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांनी कमीत कमी दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून त्यांच्या अध्यापन त्रुटीविषयी शिक्षकांची चर्चा करणे.
शिक्षकांचे एकूण काम व त्यावर नियंत्रण आणि नियमन याबाबत मुख्याध्यापक जबाबदार राहील. तसेच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबतही मुख्याध्यापक जबाबदार राहील.

शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने तसेच शाळेचे कामकाज अनुशासनबद्ध रितीने चालण्यासाठी मुख्याध्यापकाने शाळेच्या कामावर आपले लक्ष केंद्रित करणे अनिवार्य आहे.
शालेय नियोजन व त्याचे मूल्यमापन करविण्याची व ते करवून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.
१०शाळेतील वर्गव्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामावरून जसे सत्र परीक्षा, घटक चाचण्या, वार्षिक कार्य इत्यादीच्या गुणावरून त्याला वरच्या वर्गात घालण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे.
११विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने सामुहिक प्रयत्न करणे, त्या दृष्टीने अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांना योग्य व खास मार्गदर्शन करणे. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यादा वर्ग घेण्याची सोय करणे, इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.
१२मागास व हुशार विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती व्यवस्था करणे.
१३शाळा समितीच्या संमतीने क्रमिक पुस्तके, हस्तपुस्तिका, कार्यपुस्तिका इत्यादी संबंधीचे निर्णय घेणे.
१४शाळेतील शिक्षकांना निरनिराळ्या विषयाच्या प्रशिक्षण वर्गास पाठवून त्या विषयीची अद्ययावत माहिती, ज्ञान मिळविण्याच्या दृष्टीने उदयुक्त करणे.
१५इयत्ता दहावीचा निकाल उत्तोरोत्तर वाढतच जाईल याची दक्षता घेऊन शाळेचा नावलौकिक वाढविणे. इयत्ता दहावीचा निकाल सतत तीन वर्षे पर्यंत २०% च्या कमी लागल्यास त्याची जबाबदारी प्रामुख्याने मुख्याध्यापकांवरच राहील.



            तुम्हाला मुख्याध्यापकांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या | Powers Duties and Responsibilities of Principal ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad