शिक्षण विस्तार अधिकारी भूमिका | Role of Educational Extension Officer | Shikshan Vistar Adhikari Bhumika - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

शिक्षण विस्तार अधिकारी भूमिका | Role of Educational Extension Officer | Shikshan Vistar Adhikari Bhumika

शिक्षण विस्तार अधिकारी भूमिका

Role of Educational Extension Officer

शिक्षण विस्तार अधिकारी भूमिका | Role of Educational Extension Officer | Shikshan Vistar Adhikari Bhumika


अ] विस्तार अधिकारी प्रशासकीय भूमिका


अ क्रविस्तार अधिकारी प्रशासकीय भूमिका
सर्वसाधारण भूमिका
पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात बीट मधील शैक्षणिक, प्रसासकीय व आर्थिक बाबींचे सनियंत्रण करणे.
केंद्रप्रमुखांनी पटनोंदणी, उपस्थिती आणि संपादणूक पातळी या संदर्भात केलेल्या वार्षिक नियोजनाचे तसेच त्रैमासिक प्रगतीच्या अहवालाचे एकत्रीकरण करून गट शिक्षणाधिकाऱ्यांना वेळेत सादर करणे.
शैक्षणिक संस्थांची तपासणी
बीटमधील सर्व पूर्वप्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळांपैकी किमान ५ शाळांची किंवा १०% शाळांची वार्षिक तपासणी करणे.
बीटमधील केंद्रीय प्राथमिक शाळा, पगार तालुका कार्यालये, ग्रामीण वाचनालये, मान्यताप्राप्त बालवाड्या, आश्रमशाळा, नगरपालिका व कटक मंडळाच्या प्राथमिक शाळा, सरापठा शाळा यांची वार्षिक तपासणी करणे.
बीटमधील सर्व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित व विनानुदानित पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळांची शैक्षणिक, प्रसासकीय व आर्थिक तपासणी करणे, अनुदान आकारणी करणे व अनुदान मान्यतेची शिफारस करणे.

खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक नवीन शाळा परवानगी व मान्यतेबाबत, तसेच मान्यता काढून घेण्याबाबत शिफारस करणे.
ग्रामीण वाचनालयांची अनुदान आकारणी करून शिफारस करणे.
बीटमधील पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळांतील शैक्षणिक, आर्थिक व प्रसासकीय अनियमित आणि आक्षेपार्ह बाबींची प्राथमिक चौकशी करून वरिष्ठांना अहवाल देणे.
गटशिक्षणधिकारी यांनी सोपविलेल्या माध्यमिक शाळांना भेटी देणे व माध्यमिक शाळांच्या तपासणीमध्ये मदत करणे.
केंद्र प्रमुखांच्या कार्याचे सनियंत्रण
बीटमधील केंद्र प्रमुखांचे गोपनीय अभिलेख पटनोंदणी, विद्यार्थ्यांना शाळेत कायम टिकविणे व किमान अध्ययन क्षमतांवर प्रभुत्व मिळविणे याविषयी निश्चित केलेल्या वार्षिक उद्दिष्टांच्या पूर्तीच्या आधारे लिहिणे आणि केंद्र प्रमुखांनी लिहिलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांचे गोपनीय अभिलेखाचे पुनर्विलोकन करणे.
१०बीटमधील केंद्रप्रमुखांच्या नैमित्तिक रजा मंजूर करणे व त्यांच्या दीर्घ मुदतीच्या रजा अर्जावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शिफारस करणे.
११बीटमधील केद्रप्रमुखाच्या दरमहा बैठका घेऊन कामाचा सविस्तर आढावा घेणे, शासनाचे निर्णय आणि धोरणे यासंबंधी माहिती देणे व कामकाजामध्ये आवश्यक त्या सुधारणा घडवून आणणे.
१२बीटमधील केंद्रप्रमुखांची मागील महिन्याची दैनंदिनी योग्य त्या अभिप्रायासह गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे १० तारखेपूर्वी मंजुरीसाठी सादर करणे.
स्वतःचे कार्यालय आणि दप्तर
वर्षातून किमान १८० दिवस फिरती करणे.
पुढील महिन्याचा स्वतःचा संभाव्य फिरती कार्यक्रम दर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणे.
दरमहा ५ तारखेपूर्वी स्वतःची मासिम दैनंदिनी विहित नमुन्यात केलेल्या कामाच्या तपशिलासह, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे.
बीट कार्यालयाचे दप्तर अद्ययावत ठेवणे, बीट कार्यालयात स्वतःचे हालचाल रजिस्टर ठेवणे.
वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावयाचे विविध प्रस्ताव तपासून योग्य त्या शिफारशीसह विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठविणे.
बीट मधील सर्व शाळा वार्षिक नियोजनाच्या प्रगतीचे विविध योजना उपक्रम, त्रैमासिक, वार्षिक अहवाल विहित कालमर्यादित गटशिक्षणाधिकारी यांना सादर करणे.
विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी तत्सम बाबी
महिन्यातून किमान एक केंद्र सल्लागार समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे, बीटमधील ग्राम शिक्षण समितीच्या किमान एका बैठकीस उपस्थित राहणे, व ग्राम शिक्षण समित्याच्या नियमित सभा, उपक्रम इ. दृष्टीने पाहणी करणे.
विकासगट सल्लागार समिती, पंचायत समिती, शिक्षण समिती इ. विविध सभांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार हजर राहणे व आवश्यक ती माहिती सादर करणे.
बीट स्तरांवरील विविध शैक्षणिक योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात किंवा कसे याबाबत किमान ५% लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे.
दरवर्षी ३० सप्टेंबरच्या विद्यार्थी पट व उपस्थितीच्या आधारे शासनाच्या विहित निकषांनुसार बीटमधील शाळा आणि शिक्षकपदे निर्धारीत करून वरिष्ठ कार्यालयात सादर करणे व समायोजना बाबतचा आवश्यक तो प्रस्ताव सादर करणे.
शाळांना किरकोळ दुरुस्तीसाठी आलेल्या रकमेचे गरजेनुसार वाटप करणे व विशेष दुरुस्तीबाबात शिफारस करणे.
बीटमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत वरिष्ठांकडे शिफारस करणे.
गुणवंत शिक्षकांची पुरस्कार निवडीसाठी वरिष्ठांकडे शिफारस करणे.


ब] विस्तार अधिकारी शैक्षणिक भूमिका


अ क्रविस्तार अधिकारी शैक्षणिक भूमिका
शाळेत दाखल करावयाच्या मुलामुलींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. याचा आढावा घेणे व ५% कुटुंबाची प्रत्यक्ष पडताळणी करणे.
महिन्यातून किमान एका गट संमेलनास उपस्थित राहून शैक्षणिक कारभाराचा आढावा येणे व मार्गदर्शन करणे.
क्षमता चाचण्या, निबंध, गृहपाठ, स्वाध्याय, प्रयोग प्रात्यक्षिके इ. बाबत प्रत्येक केंद्र प्रमुखाने केलेल्या शाळानिहाय व विषयनिहाय नियोजनाच्या ५% कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे,
बीटमधील शाळांच्या वार्षिक निकालपत्रकास मान्यता देणे.
प्रौढशिक्षण केंद्र, जनशिक्षण निलयम केंद्र, अनौपचारिक शिक्षण केंद्र, महिला प्रबोधन केंद्र यांना भेटी देऊन त्यांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे.
नैतिक शिक्षण, अपंग एकात्म शिक्षण, वंचितांचे शिक्षण, मतिमंदाचे शिक्षण इ. बाबत शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र मुलामुलींना मिळेल यादृष्टीने मेळावे, पालकसभा, ग्रामसभा, ग्रामशिक्षण समिती इ. सभांतून माहिती देणे.
दर तिमाहीस किमान एका शाळेची क्षमता चाचणी घेणे.

बीटमधील शिक्षकांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाबद्दलची शिक्षकनिहाय अद्यावत माहिती ठेवणे व विविध प्रशिक्षण वर्गांसाठी शिक्षक उपस्थित राहतील याची खात्री करणे.



क] विस्तार अधिकारी आर्थिक बाबीसंबंधी भूमिका


अ क्रविस्तार अधिकारी आर्थिक बाबीसंबंधी भूमिका
शालेय साहित्याची विहित कार्यपद्धतीनुसार खरेदी, त्यांच्या नोंदी, त्यांचा योग्य वापर, निगा व दुरुस्ती व आयोग्य साहित्य निर्लेखित करणे इ. कामे नियमानुसार व वेळच्यावेळी केली जातील हे पाहणे.
सर्व शाळांची जमाखर्च, कॅशबुक, डेड्स्टॉक, खतावणी इ. आर्थिक व्यवहारासंबंधी रजिस्टर्स विहित नमुन्यात व अद्यावत ठेवली आहेत याची खात्री करणे.
वापरून निकामी झालेले साहित्य निर्लेखित करण्याची शिफारस करणे.



            तुम्हाला शिक्षण विस्तार अधिकारी भूमिका | Role of Educational Extension Officer | Shikshan Vistar Adhikari Bhumika ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad