मकर संक्रांती भाषण | Makar Sankranti Speech In Marathi | Makar Sankranti Bhashan - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, January 5, 2025

मकर संक्रांती भाषण | Makar Sankranti Speech In Marathi | Makar Sankranti Bhashan

मकर संक्रांती भाषण

Makar Sankranti Speech In Marathi

Makar Sankranti Bhashan

मकर संक्रांती भाषण | Makar Sankranti Speech In Marathi | Makar Sankranti Bhashan
            मकर संक्रांत ( Makar Sankranti Speech In Marathi | Makar Sankranti Bhashan) हा शब्द ऐकल्या बरोबर डोळ्यासमोर दिसतात ते तिळाचे लाडू, तिळगुळ आणि पतंग परंतु असे का? असा आपण कधी विचार केला का? तर भारत हा धार्मिक अस्मिता जपणारा देश आहे. ही अस्मिता जपत असताना आपण अनेक सण साजरे करतो. आणि तसेही म्हटलेच जाते की भारत सणांची भूमी असलेला देश आहे. भारतात जानेवारी या इंग्रजी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. 


            मकर संक्रांत (Makar Sankranti ) हा सण सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात व इंग्रजी महिन्यानुसार साधारणतः १४ किवा १५ जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण हिंदूंचा प्रमुख सण आहे. या दिवसापासून इंग्रजी वर्षातील हिंदूंच्या सणांची सुरुवात होते. मकर संक्रांत या सणला विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जसे की महाराष्ट्रात मकर संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये उत्तर संक्रांती, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये संक्रांती, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये उत्तरायण किंवा खिचडी, तमिळनाडूमध्ये पोंगल, पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी तर आसाममध्ये बिहू या नावाने ओळखला जाते.


            भारतामध्ये सर्वच सण साजरे करण्यामागे काही ना काही करणे असतात मग ते धार्मिक, पौराणिक किंवा त्यामागे काही श्रद्धा अथवा कथा असतात परंतु मकर संक्रांत हा सण खऱ्या अर्थाने शेतकरी देवाकडे पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी व त्यांच्यावर सदैव कृपा ठेवण्यासाठी सूर्यदेवाचे आभार मानण्यासाठी साजरा करतो. तसेच या दिवशी शेतकरी शेतात वापरल्या जाणार्‍या साधनांची व सूर्यदेवाची पूजा करतो.

            मकर संक्रांतीच्या दिवशी लोकांनी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून भगवान सूर्याची पूजा करावी आणि दान करावे अशी प्रथा बऱ्याच ठिकाणी मानण्यात येते. या दिवशी तीळ, गूळ, ज्वारी, बाजरी यापासून बनवलेले पदार्थ सूर्याला अर्पण केले जातात आणि नंतर लोक आपल्या स्नेहीना देतात व स्वतः देखील सेवन करतात.


            मकर संक्रांतीच्या दिवशी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो म्हणजेच तो दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जाऊ लागतो, यालाच आपण 'उत्तरायण' म्हणतो. व तेव्हा सूर्य हा मकर राशीत असतो हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे व अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी जी व्यक्ती पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपले पाप धुवते आणि सूर्यदेवाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेते त्या व्यक्तीला सूर्य देव प्रसन्न होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असेही मानले जाते. या दिवशी केलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते असे मानले जाते.


            सणाच्या दिवशी काळा रंग वर्ज्य मानला जातो परंतु मकर संक्रात एकमेव सण असा आहे ज्या दिवशी सर्व काळे कपडे घालता कारण हा सण हिवाळ्यात येतो तेव्हा आपल्याला उष्णतेची गरज असते व काळा रंग उष्णता शोषून घेतो. तसेच या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत महिला वर्ग हळद - कुंकूवाचा समारंभ आयोजित करतात व वाण देण्या-घेण्यासाठी बोलावतात. तसेच मकर संक्रांत हा पतंगबाजीचा सण म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा असून पतंगबाजीचे आयोजनही केले जाते. या पतंगबाजीच्या खेळत प्रौढ आणि मुले मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. यासाठी सर्वांनी खूप दिवसाअगोदर पासूनच तयारी सुरु असते. पतंग खरेदी करणे भक्कम व पक्का मांजा घेणे व आकाशात उंचच उंच पतंग उडविणे व समोर आलेल्या पतंगीला कापणे असे खेळ दिवसभर चालू असतात. आकाशात सर्वत्र जणू काही पतंगीचे साम्राज्य पसरलेले असते. संपूर्ण आकाश जसे काही रंग बिरंगी फुलांनी सजलेले आहे असा भास होतो. काही ठिकाणी तर पतंगबाजीचे सामने भरतात.


            मकर संक्रांत हा सण भारतात व भारतात बाहेर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो ते पुढील प्रमाणे आहेत.

मकर संक्रांतीची नावे | Makar Sankranti Names

सणाची नावेदेश / राज्य / प्रदेश
मकर संक्रांतीछत्तीसगड, गोवा, ओडिशा, हरियाणा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि जम्मू
मकर संक्रमणकर्नाटक
उत्तरायणगुजरात, उत्तराखंड
माघीहरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब
शिशूर संक्रांतकाश्मीर खोर्‍यात
खिचडीउत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार
भोगली बिहूआसाम
पौष संक्रांतीपश्चिम बंगाल
उत्तरैन, माघी संगरांदजम्मू
ताड़ पोंगल, उझवर तिरुनलतमिळनाडू
शकरैन / पौष संक्रांतीबांगलादेश
माघे संक्रांती किंवा 'माघी संक्रांती' 'खिचडी संक्रांती'नेपाळ
सॉन्गकरणथायलंड
लाओसपी मा लाओ
थियानम्यानमार
मोहा संगक्रानकंबोडिया
पोंगल, उझावर तिरुनलश्रीलंका


हे पण पहा :- विज्ञान दिन
            तुम्हाला मकर संक्रांती भाषण | Makar Sankranti Speech In Marathi | Makar Sankranti Bhashan ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad