वृत्तविचार | Vrut in marathi | Vrutt Vichar - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 16, 2024

वृत्तविचार | Vrut in marathi | Vrutt Vichar

वृत्तविचार

Vrut in marathi

Vrutt Vichar in Marathi

वृत्तविचार | Vrut in marathi

वृत्तविचार हा घटक पद्यांशी संबंधित असून वृत्तविचार बघण्या अगोदर गद्य व पद्य म्हणजे काय हे बघूया

गद्य :-

            गद्य म्हणजे जेव्हा व्यक्ती आपले विचार सहजपणे एका मागून एक वाक्याच्या स्वरूपात बोलतो किंवा लिहितो त्याला गद्य असे म्हणतात.
            गद्यामध्ये सहजपणे वाक्य बोलतात त्यात लय ताल याला महत्व नसते. हे आपले दैनंदिनाचे बोलणे असते.
उदा.
काळ्या शेतात नंदिबैलाची जोडी नांगरला जुपून सदाशिव शेत नांगरतो.

पद्य :-

            पद्य म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपले विचार शब्दांची रचना विशिष्ट रचना करून मागेपुढे क्रम ठेवून एका तालासुरात गाऊन म्हणते त्याला पद्य असे म्हणतात.
उदा.
काळ्या मातीत मातीत तिफन चालते.
नंदी बैलाच्या जोडीला सदाशिव हाकतो.

वृत्त हा घटक पद्याशी संबंधित असल्याने त्याविषयी काही महत्वाच्या बाबी

1) वृत्त किंवा छंद:-

            पद्यामध्ये विशिष्ट शब्द रचना केली जाते त्याला वृत्त किंवा छंद म्हणतात.

2) चरण:-

            विचारातील वाक्य सरळ स्वरूपात बोलले किंवा लिहले न जाता त्याची रचना लयबद्ध स्वरूपात करणे म्हणजे चरण होय.

3) मात्रा:-

            अक्षराचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला मात्रा असे म्हणतात.

4) लघु उच्चार ( U ):-

            ज्या अक्षरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला लघु उच्चार ( लघु अक्षर ) असे म्हणतात. त्यांच्यासाठी एक मात्रा दिली जाते त्यासाठी "U" हे चिन्ह वापरतात.
उदा. अ, इ, उ, ऋ आणि हे स्वर मिसळून तयार झालेले अक्षर ब, बि, बु, बृ

5) दीर्घ उच्चार ( - ) :-

            ज्या अक्षरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ उच्चार ( दीर्घ अक्षर ) म्हणतात.
त्यांना गुरुवर्ण असे देखील म्हटले जाते. त्यांच्यासाठी दोन मात्रा दिली जाते त्यासाठी " - " हे चिन्ह वापरतात.
उदा.आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ आणि हे व्यंजन मिसळून तयार झालेले अक्षर बा, बी, बू, बे, बै, बो, बौ

6) मात्रा मोजण्याचे नियम:-

अ) लघु किंवा ऱ्हस्व अक्षराची एक मात्रा मोजतात.
उदा.  स  म  र
          u  u  u

ब) गुरु किंवा दीर्घ अक्षराची दोन मात्रा मोजतात.
उदा. आ भा ळी
          -    -    -

क) अक्षर लघु असेल परंतु त्याच्या समोर जोडाक्षर येत असेल व त्याचा आघात जर त्याच्यावर येत असेल तर ते दीर्घ असते.
उदा. स ज्ज ना
         -   -    -

ड) अक्षर लघु असेल त्याच्या समोर जोडाक्षर येत असेल परंतु त्याचा आघात जर त्याच्यावर येत नसेल तर ते लघुच राहते.
उदा.  उ  न्हा  ळा
          u    -    -

इ) जोडाक्षरातील शेवटचा वर्ण लघु असेल तर जोडाक्षर लघुच असतो.
उदा. मा  स्त  र
         -    u   u

फ) जोडाक्षरातील शेवटचा वर्ण दीर्घ असेल तर तो गुरु असतो.
उदा.   स  ज्जा
           -    -

ग) लघु अक्षरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे.
उदा.  अं  ज  ली
          -   u   -
          दु: खी
           -    -

ह) कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते गुरु मानावे.
उदा.      
                     
आ र क्तहो य फुलु नी प्रण यी पला श

-  -   u

-   u  u

u   -  u

u  -  u

-   -



7) गण :-

            पदाच्या चरणातील अक्षरांना लघु-गुरु असा क्रम मांडून वृत्तांची लक्षणे ठरविताना त्यातील प्रत्येकी तीन-तीन अक्षरांचा एक-एक असा गट तयार केला जातो त्या गटाला गण असे म्हणतात.
            थोडक्यात अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण होय. यामध्ये साधारणतः य, र, त, न, भ, ज, स आणि म असे आठ गण पडतात ते पुढील प्रमाणे.

गण

गणगणांची नावेगणक्रम
य गणआद्यलघुu   - -
र गणमध्यलघु-  u  -
त गणअंत्यलघु-  -  u
न गणसर्वलघुu  u  u
भ गणआद्यगुरु-  u  u
ज गणमध्यगुरुu  -  u
स गणअंत्यगुरुu  u  -
म गणसर्वगुरु-   -   -


8) यती :- 

            कवितेचे चरण म्हणतांना चरणामध्ये विशिष्ट ठिकाणी आपण थोडा वेळ थांबतो या थांबण्याच्या स्थळालाच यती म्हणतात.
यती वृत्त उदाहरण :- 
क्षणो क्षणी पडे उठे परि बळ उडे बापडी.
येथे ठे व डी या ठिकाणी थांबतो ठे आठवे अक्षर व डी सतरावे अक्षर आहे म्हणून यती आठव्या व सत्तराव्या अक्षरावर आली आहे.

9) यतीभंग :- 

            एखाद्यावेळी कवितेचे चरण म्हणतांना एखाद्या अखंड शब्दात थांबलो तर त्याला यतीभंग म्हणतात.
यतिभंग नरहरि = नर हरि

10) ल-ग क्रम :- 

            लघु व गुरु क्रमालाच लगक्रमअसे म्हणतात.
            कवितेच्या एका चरणामध्ये बारा अक्षरे असतात तेव्हा त्यांचे तीन-तीनचे गट केले जातात परंतु जेव्हा चौदा अक्षरे असतात तेव्हा शेवटी दोन अक्षरे उरतात तेव्हा त्यांना लघु असल्यास ल व गुरु असल्यास ग लिहिले जाते.
उदा. कथा हे कृष्णाची सकलजणदानंदजननी

क था हे कृ ष्णा ची स क ल
u – uu - -u u u

ज ण दानं द ज न नी
u u -- u uu -
ल 



वृत्तांचे प्रकार :-

१) छंद :- 

            पद्यामध्ये विशिष्ट शब्द रचना केली जाते त्याला छंद म्हणतात.

छंदाचे दोन प्रकार आहेत.

अ) मुक्तछंद वृत्त :- 

            मुक्तछंद वृत्त म्हणजे जेव्हा पद्यरचनेत अक्षर संख्या, चरण संख्या, गण, मात्रा किंवा लगक्रम यांच्यामध्ये कोणतेही बंधन नसते अर्थात ते नियमांपासून मुक्त असतात म्हणून त्यांना मुक्तछंद वृत्त असे म्हणतात.
उदा.
देवा याही देशात पाऊस पाड
जिथे पाण्याला येतो खुनाचा वास
जिथे हिंसेच्यामळ्यात पिकतो ऊस आणि ताग
देवा, जोवर तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग.

हे पण पहा :- शब्दांच्या जाती

ब) अक्षर छंदवृत्त :- 

            छंदवृत्त म्हणजे पद्याच्या प्रत्येक ओळीतील अक्षर संख्या ठराविक असते. ती अक्षरे ऱ्हस्व, दीर्घ कशी ही लिहिली असली तरी छंदोवृत्तात प्रत्येक अक्षर बहुदा दीर्घ उच्चारले जाते. यालाच अक्षर गणवृत्त असेही म्हटले जाते.
अक्षर छंदवृत्त उदाहरण :- 
ओवी, अभंग
पहिली माझी ओवी | पहिला माझा नेम ||
तुळशीखाली राम | पोथी वाची ||

२) अक्षरगणवृत्त म्हणजे काय :- 

            ज्या वृत्तप्रकारात अक्षर संख्येचे बंधन असून गण क्रमाने त्या अक्षराची बांधणी असते त्याला अक्षरगणवृत्त असे म्हणतात.

अक्षरगणवृत्ताचे प्रकार :-

            अक्षरगणवृत्ताचे अकरा प्रकार आहते ते पुढीलप्रमाणे आहेत.

अक्षरगणवृत्ताचे प्रकार

अक्षगणवृत्तगणअक्षरे
इंद्रवज्रात त ज ग ग११
उपेन्द्र्वज्राज त ज ग ग११
उपजाती--
भुजंगप्रयातय य य य१२
वसंततिलकात भ ज ज ग ग१४
मालिनीन न म य य१५
मंदाक्रांताम भ न त त ग ग१७
पृथ्वीज स ज स य ल ग१७
शार्दूलविक्रीडितम स ज स त त ग१९
मंदारमालात त त त त त त ग२२
सुमंदारमलाय य य य य य य ल ग२३

अ] इंद्रवज्रा :- 

            इंद्रवज्रा अक्षरगणवृत्तामध्ये अकरा अक्षर संख्या असतात. त्यांचा गणक्रम त-त-ज-ग-ग अशा स्वरूपाचा असतो व पाचव्या अक्षरावर यती येते.
इंद्रवज्रा वृत्त उदाहरण :- 
दु:खी जगा देखोनिया द्रवेते
सच्चत माते नवनित वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्रावज्रासहित लाजविते.


अ न्या यको ठे दिस ता परी ते

-   -   u

-   -   u

u  - u

-  -

ग ग


ब] उपेंद्रवज्रा :- 

            उपेंद्रवज्रा अक्षरगणवृत्तामध्ये अकरा अक्षर संख्या असतात. त्यांच्या गणक्रम ज-त-ज-ग-ग अशा स्वरूपाचा असतो व पाचव्या अक्षरावर यती येते.
उपेंद्रवज्रा वृत्त उदाहरण :- 
तयावनी एक लटाक तो ये
तुडूंबले लामरसानवाये
विरंतरामंद मकरंद वाहे
तपातही यास्तव रिक्त नोव्हे

त या वनी ए कल टा कतो ये

u - u

- - u

u - u

- -

ग ग

क] उपजाती :- 

            उपजाती अक्षरगणवृत्तामध्ये अकरा अक्षर संख्या असतात. त्यामध्ये काही चरण इंद्र्वज्राची तर काही चरण उपेंद्रवज्राची असतात. कधी-कधी पहिले दोन चरण इंद्र्वज्राची असतात [ त-त-ज-ग-ग ] व त्यापुढील दोन चरण उपेंद्रवज्राची असतात [ ज-त-ज-ग-ग ]
उपजाती वृत्त उदाहरण :- 
हा जातिविध्वंसन काल आला
समानतेच्या उभवा ध्वजाला
राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी
न जाति तो वा उपजाति मानी


इंद्र्वज्राची
रा ष्ट्री यजो स र्वज ना भिमा नी

- - u

- - u

u - u

- -

ग ग

उपेंद्रवज्राची
न जा तितो वा उप जा तिमा नी

u - u

- - u

u - u

- -

ग ग

ड] भुजंगप्रयात :- 

            भुजंगप्रयात अक्षरगणवृत्तामध्ये बारा अक्षर संख्या असतात. त्यांच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असून प्रत्येक चरण हे बारा अक्षरानी बंदिस्त असते व त्यांचा गणक्रम ( य-य-य-य ) असून यति ही सहाव्या अक्षरावर असते.
भुजंगप्रयात वृत्त उदाहरण :- 
करू मी समाधान जो मूर्ख त्याचे
धरू ये सुखें चित्त धै जाणत्याचे
न जाणे न नेणे अशा पामराला
बुझावूं शकेना विधाता तमाला

क रू मीस मा धान जो मूर्ख त्या चे

u - -

u - -

u - -

u - -


इ] वसंततिलका :- 

            वसंततिलका हे अक्षरगणवृत्त असून यामध्ये प्रत्येक कडव्यात चार चरण असतात आणि प्रत्येक चरणात चौदा अक्षर असतात. त्यांचा गणक्रम (त-भ-ज-ज-ग-ग) असून यति ही आठव्या अक्षरावर असते.
वसंततिलका वृत्त उदाहरण :- 
होतो लहान बहु खेळुन तृप्त झालो
अंकी तुझ्या, तिथुन थोरपणी निघालो,
मातेसमीप असती, परि थोर होती
तेव्हा पिलें सहज सोडुन तीस जाती!


अं की तुझ्या ति थुन थो रप णीं निघा लों

- - u

- u u

u - u

u - u

- -

ग ग

फ] मालिनी :-

            मालिनी हे अक्षर गणवृत्त असून त्याच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात. त्यांचा गणक्रम (न-न- म-य-य ) असून यति ही आठव्या व पंधराव्या अक्षरावर असते.
मालिनी वृत्त उदाहरण :- 
तदितर खग भेंणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे करावया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो


क ठि णस म यये ता कोण का मास ये तो

u u u

u u u

- - -

u - -

u - -




ग] मंदाक्रांता :- 

            मंदाक्रांता हे अक्षरगणवृत्त असून त्यांच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. त्याच्या प्रत्येक चरणात सतरा अक्षरे असतात. त्यांचा गणक्रम (म-भ-न-त-त-ग-ग) असून यती चार, दहा, सतरा अक्षरांवर यति असते.
मंदाक्रांता वृत्त उदाहरण :- 
पोटासाठी भटकत जरी दूरदेशीं फिरेन,
मी राजाच्या सदनिं अथवा घोर रानीं शिरेन;
नेवो, नेते, जड तनुस या दूर देशास दैव
राहे चित्तीं प्रिय मम परी जन्मभूमीस दैव

पो टा साठी भ टक त ज
- - -- u uu u u

री दू रदे शीं फि रे न
- - u- - u- -
ग ग


ह] पृथ्वी :- 

            पृथ्वी हे अक्षरगणवृत्त असून त्यांच्या प्रत्येक कडव्यात चार चरण असतात. त्याच्या प्रत्येक चरणात सतरा अक्षरे असतात. त्यांचा गणक्रम (ज-स-ज-स-य-ल-ग) असून यती चार, दहा, सतरा अक्षरांवर यति असते.
पृथ्वी वृत्त उदाहरण :- 
सुसंगति सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो

सु सं गति स दाघ डो सु
u - uu u -u - u

ज न वाक्य का नीप डो
u u -u - -u -
ल ग


च] शार्दूलविक्रीडित :- 

            शार्दूलविक्रीडित या अक्षरगणवृत्तामध्ये प्रत्येक कडव्यात चार चरण असून प्रत्येक चरणात एकोणिस अक्षरे असतात. त्यांचा गणक्रम ( म-स-ज-स-त-त-ग) असून बाराव्या आणि एकोणिसाव्या अक्षरांवर यति असते.
शार्दूलविक्रीडित वृत्त उदाहरण :- 
आजीच्या जवळी घड्याळ कसलें आहे चमत्कारिक
देई ठेवुनि तें कुठें अजुनि हें नाहीं कुणा ठाऊक; 
त्याची टिक् टिक् चालते न काधोही, आहे मुकें वाटते; 
किल्ली देऊन त्यास ती कधोतरी तेंसार खेंचाल तें !

आ जी च्याज व ळीघ ड्या ळक स लें

-     -   -

u   u  -

u   -  u

u  u  -

आ हे चम त्का रि

-  -   u

-   -   u



छ] मंदारमाला :- 

            मंदारमाला या अक्षरगणवृत्तामध्ये प्रत्येक कडव्यात दोन किंवा चार चरणाचा समावेश होत असून प्रत्येक चरणात २२ अक्षर असतात. त्यांचा गणक्रम ( त-त-त-त-त-त-त-ग ) असून यति चौथ्या, दहाव्या, सोळाव्या आणि बाविसाव्या अक्षरावर येते.
मंदारमाला वृत्त उदाहरण :- 
वाचाळ मी धीट पाचारितों नीट त्याचा न यो वीट साचा हरी
खोटा जरी मीच खोटा मधें तूंच मोठा कृपेचा न तोटा धरी
दाता सुखाचा सदा तारिता आपदा ताप दे एकदा तापटी
या संतसे व्हावया संपदा हे भया संग नाशील या संकटी

वा चा ळमी धी टपा चा रितों नी ट 

 -  -  u

-  -  u

 -  -  u

 -  -  u

त्या चा नयो वी टसा चा ह री

  -  -  u

  -  -  u

  -  -  u

 -

 


ज] सुमंदारमाला :-

            सुमंदारमाला या अक्षरगणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात २३ अक्षर असतात. त्यांचा गणक्रम ( य-य-य-य-य-य-य-ल-ग ) असून यति पाचव्या, अकराव्या आणि सतराव्या अक्षरावर येते.
सुमंदारमाला वृत्त उदाहरण :- 
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

म रा ठीअ से आमु ची माय बो ली

u  -  -

u  -  -

u  -  -

u  -  -

ज री आज ही राज भा षान से 

u  -  -

u  -  -

u  -  -

u  - 

ल ग

            तुम्हाला वृत्तविचार | Vrut in Marathi| Vrut Vichar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad