भारतातील आश्चर्यकारक गावे | Amazing villages in India - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2025

भारतातील आश्चर्यकारक गावे | Amazing villages in India

भारतातील आश्चर्यकारक गावे

Amazing villages in India

भारतातील आश्चर्यकारक गावे | Amazing villages in India

भारतातील आश्चर्यकारक गावे ( Amazing villages in India ) ही तेथील लोकांच्या राहणीमान, वागण्यातून व संस्कृतीतून एक वेगळीच छाप सोडून जातात अशाच काही भारतातील आश्चर्यकारक गावांची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.


  

कोडिन्ही :-

केरळ राज्यातील कोडिन्ही हे गाव जुळ्यांचे गांव म्हणून ओळखले जाते. या गावात जवळपास प्रत्येक घरात जुळे आहेत.


कुलधारा :-

राजस्थान राज्यातील कुलधारा या गावाला "अनिवासी" गांव म्हणून ओळखले जाते. या गांवात कोणीही रहात नाही.  येथे सर्व घरे बेवारस सोडलेली आहेत.


जंबुर :- 

भारतातील गुजरात राज्यात जंबुर हे गाव आफ्रिकन लोकांच गाव म्हणून ओळखले जाते. येथील लोक भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक "आफ्रिकन" वाटतात.


पुंसरी :- 

भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव म्हणून गुजरात राज्यातील पुंसरी गाव ओळखले जाते. या गावातील सर्व घरात CCTV जोडण्या आलेले असून तेथे Wi-Fi सुविधाही उपलब्ध आहेत. गांवातील सर्व रस्त्याकाठचे बल्ब सौरउर्जेवर चालतात.


हिवरे बाजार :- 

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे एक गाव आहे. या गावात आगोदर कोरडा दुष्काळ होता पण सरपंच पोपटराव पवार व ग्रामसहभागातून हे गाव जलमय झाले. या गावात केवळ ३०५ कुटुंबे राहतात, ज्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक करोडपती आहेत. हे भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे असून येथील ६० अब्जाधीश घरे आहेत व गावात एकही "गरीब" नाही. हे सर्वाधिक GDP असणारं खेड गाव आहे.


शेटफळ :- 

भारताच्या महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्हा, मोहोळ तालुक्यातील शेटफळ हे एक गाव आहे. येथे जगातील सर्वात भयंकर सापांपैकी एक भारतीय कोब्रा सापांना कुटुंबीय मानले जाते. आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याप्रमाणेच सापांना घरात कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि हेच एखाद्याच्या घराच्या मर्यादेत घडते. गावातही या सापांना इतर रहिवाशांप्रमाणेच मुक्तपणे फिरण्याची मुभा आहे.


शनि शिंगणापूर :-

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.


आळंदी :-

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आळंदी गाव आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. या गावात आजही मास - मटण मिळत नाही या गोष्टीला ७०० पेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत.



मधोपत्ती :-

  उत्तर प्रदेश राज्यातील मधोपत्ती गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव आहे, ९० % पेक्षा जास्त सरकारी नोकरी मध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव आहे.


झुंझनु :- 

राजस्थान राज्यातील झुंझनु हे गाव  फौजींच गाव म्हणून ओळखलं जाते. एका घरातून तीन ते चार फौजी असतात, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी आहेत. खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती ६ हजार पेक्षा जास्त सेवा निवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू झालेत.


भिंतघर :- 

महाराष्ट्र राज्यामधील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गावात प्रवेश करताच सगळी घरे गुलाबी रंगात दिसतात. हा रंग स्त्री शक्तीचे प्रतीक मानला जातो. सर्व घराबाहेर रोपे लावण्यात आली आहेत. येथील प्रत्येक घर स्वच्छ आणि आकर्षक करण्यात आले आहे. नाशिकच्या या गुलाबी गावात प्रत्येक घराबाहेर चांगले विचार लिहिलेले असतात. प्रत्येक घराबाहेरील नेमप्लेटवर स्त्री-पुरुषांची नावे लिहिली जातात. स्वच्छतेतही हे गाव अव्वल आहे. गावातील गोठा हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. गावातील प्रत्येक चौकाचौकात रांगोळीने सजलेले रस्ते तुम्हाला पाहायला मिळतील. 


मायोंग :- 

आसाम राज्यातील ,मायोंग  या गावाला 'जादूटोणा करणाऱ्यांचं गाव' म्हणून ओळखले जाते. आजच्या आधुनिक जगात जादूटोणा मानला जात नसला तरी या गावातील लोक जादूटोणा आणि तंत्रविद्येवर भालेतच विश्वास ठेवून आहेत. येथील गावकऱ्यांना असे वाटतं की तंत्रमंत्राने कोणतीही इच्छा पूर्ण करता येते. या गावात काळ्या जादूचे प्रयोग केले जातात. भारतातील हे एक सर्वात मोठं जादूटोणा करणाऱ्यांचं व शिकणाऱ्यांचं गाव आहे.


मत्तूर :- 

कर्नाटक राज्यातील मत्तूर हे गाव दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी "संस्कृत" भाषेचा वापर करणारे 10,000 वस्तीचे गांव आहे.


बरवानकाला :- 

बिहार राज्यातील बरवानकाला या गावाला ब्रम्हचाऱ्यांचे गांव म्हणून ओळखले जाते कारण येथे गेल्या ५० वर्षांपासून लग्न सोहळाच झालेला नाही.


मॉवलिनॉन्ग :- 

मेघालया राज्यातील मॉवलिनॉन्ग हे गाव 'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव म्हणून ओळखले जाते. या गावातील पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्प आहे.


रोंगडोई :- 

आसाम राज्यातील रोंगडोई  या गावातील लोक बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारे आहेत. असे बेडकाचे लग्न लावणे येथील 'ग्रामसण' च आहे..


कोर्ले :- 

महाराष्ट्र राज्यातील कोर्ले गांव हे रायगड जिल्ह्यातील एक गाव असून या गावात स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीज गेल्यानंतरही या गावात "पोर्तुगीज:" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरली जाते.


हे पण पहा :- पसायदान व त्याचा अर्थ
           तुम्हाला भारतातील आश्चर्यकारक गावे | Amazing villages in India ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad