मराठी बोधकथा - लांडगा आणि बकरी
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
दर वर्षा प्रमाणेच एकदा कडक उन्हाळ्याचे दिवस होते. बहुतेक प्राणी चरावयास बाहेर आले नाहीत. लांडग्याला फार भुक लागली होती. शेवटी त्याला एक बकरी चरताना दिसली. लांडग्याला खुप आनंद झाला. तो बकरीवर उडी मारण्याआधीच गुरगुरु लागला. बकरी सावध झाली. व जोराने पळू लागली. लांडगा बकरीचा पाठलाग करू लागला. दोघेही त्यांच्या पुर्ण क्षमतेने पळत होते.
शेवटी बकरी एका उंच खडकावर चढली. लांडगा खालीच राहीला. बकरी उपहासाने म्हणाली, "मुर्ख लांडग्या, माझा पाठलाग करण्याऐवजी तू तुझे तोंड उघड. मी त्यामध्ये उडी मारते." मुर्ख लांडग्याने तोंड उघडले. बकरीने उडी मारली पण लांडग्याच्या डोक्यावर ! लांडग्याची मान मोडली व तो मेला.
बोध :- लोभीपणाचे फळ.
तुम्हाला मराठी बोधकथा - लांडगा आणि बकरी | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
छान बोधकथा आहे
ReplyDelete