मराठी बोधकथा - आळशी नोकर
Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi
एका गावात दोन नोकर एका आजीबाईंचे काम करत असत. आजी दररोज सकाळी लवकर ऊठत असत. कोंबडा आरवताच त्या नोकरांना कामासाठी ऊठवित. नोकरांना कोंबड्याचा फार राग येत असे. एके दिवशी त्यांनी कोंबड्याला ठार मारले. ते आनंदात घरी परत आले. त्यांनी विचार केला, "कोबडा नसल्यामुळे आजी लवकर ऊठणार नाहीत व आपल्यालाही ऊठावे लागणार नाही."
परंतु डाव उलटला. कोंबडा नसल्यामुळे आजींना जेव्हां जाग येई तेव्हा त्या नोकरांना ऊठवित असे. आता नोकरांची अवस्था बिकट झाली होती.
बोध :- आळसाने कोणचेही भले होत नाही.
तुम्हाला मराठी बोधकथा - मानवता | Marathi Bodh Katha | Moral Story in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box